लखीमपूर हिंसाचार सुनियोजित कट; एसआयटी तपासात उघड

लखीमपूर – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी प्रकरणाला नवे वळण लागले आहे. लखीमपूर खेरी येथील घटना हा सुनियोजित कट होता, असे एसआयटीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. एसआयटीने आता आरोपींवर लावण्यात आलेल्या कलमांमध्येही बदल केला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यावर आता निर्दोष हत्येऐवजी हत्येचा खटला चालणार आहे.

लखीमपूर घटनेतील मुख्य आरोपी आशिष मिश्रासह १४ जणांवरील चौकशीनंतर कलमांमध्ये बदल करण्यात आला. सर्व आरोपींवर जाणीवपूर्वक नियोजन करून गुन्हा केल्याचा आरोप आहे. एसआयटीने भांदवि (आयपीएस) कलम २७९, ३३८, ३०४ अ काढून ३०७, ३२६, ३०२, ३४, १२० बी, १४७, १४८, १४९, ३/२५/३० या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यावर्षी ३ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथील टिकुनिया येथे एका कार्यक्रमात कृषी कायद्यांचा निषेध करून परतत असताना, चार शेतकऱ्यांना कारने चिरडले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी उपस्थित होते. या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचारात काही लोकांचा मृत्यूही झाला होता. या घटनेत स्थानिक पत्रकार रमन कश्यप यांचाही मृत्यू झाला होता. शेतकऱ्यांना चिरडणारी गाडी अजय मिश्रा टेनी यांची असून, त्यात त्यांचा मुलगा आशिष मिश्रा असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पहिली सुनावणी ८ ऑक्टोबर रोजी झाली. त्यानंतर आशिष मिश्रा उर्फ ​​मोनू याला अनेक तासांच्या चौकशीनंतर ९ ऑक्टोबरला अटक करण्यात आली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …