लखीमपूर हिंसाचार : योगी सरकारच्या कारवाईवर सुप्रीम कोर्टाकडून नाराजी

सुनावणी २६ आॅक्टोबरपर्यंत स्थगित
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील साक्षीदारांचे संरक्षण करण्यास सांगितले आहे. साक्षीदारांचे जबाब लवकरात लवकर दंडाधिकाºयांसमोर नोंदवावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिले. राज्य सरकारने आतापर्यंत केलेल्या कारवाईवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने म्हटले की, सरकारने अशी प्रतिमा तयार होऊ देऊ नये ज्यामुळे आपले पाय मागे ओढले जातील. ८ आॅक्टोबर रोजी झालेल्या शेवटच्या सुनावणीत न्यायालयाने मुख्य आरोपी आशिष मिश्राला अटक न केल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारला जोरदार फटकारले होते. बुधवारच्या सुनावणीत असे प्रश्न उपस्थित केले गेले की, पोलिसांनी पकडलेल्या आरोपींच्या अधिक कोठडीची मागणी का केली नाही? तीन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याला न्यायालयीन कोठडीत जाण्याची परवानगी का देण्यात आली?

सरन्यायाधीश न्या. एन. व्ही. रमणा यांनी उत्तर प्रदेश सरकारने स्थिती अहवाल उशिरा दाखल केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाचे अध्यक्ष असलेले न्या. रमणा म्हणाले की, संध्याकाळी उशिरापर्यंत या अहवालाची वाट पाहत राहिलो. अशाप्रकारे, सुनावणीपूर्वी अहवाल देणे चुकीचे आहे. यूपी सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्याची सूचना केली; पण न्यायाधीशांनी त्याला नकार दिला. त्यांनी अहवाल वाचला आणि सुनावणी केली. न्यायदंडाधिकाºयांसमोर आतापर्यंत साक्षीदारांचे जबाब का नोंदवले गेले नाहीत? असा सवाल खंडपीठाचे सदस्य न्या. सूर्यकांत यांनी केला. हरीश साळवे यांनी दसºयाच्या सुट्टीमुळे न्यायालय बंद असल्याचा हवाला दिला. या उत्तराने न्यायाधीश समाधानी नव्हते. खंडपीठाच्या तिसºया सदस्या न्या. हिमा कोहली म्हणाल्या, सरकारने अशी प्रतिमा पुसून टाकावी.
यूपी सरकारचे वकील साळवे म्हणाले की, न्यायालयाने त्यांना एक आठवड्याची मुदत द्यावी. तोपर्यंत या उणिवा दूर होतील. त्यावर न्यायाधीशांनी २६ आॅक्टोबर रोजी पुढील सुनावणी होईल, असे सांगितले. न्यायालयाने म्हटले आहे की, खटल्यातील साक्षीदारांची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे. या सुनावणी दरम्यान राज्य सरकारने १० आरोपींना अटक आणि ४४ साक्षीदारांच्या ओळखीबाबत माहिती दिली, न्यायालयाने ते रेकॉर्डवर घेतले. न्यायाधीशांनी यूपी सरकारला पुढील सुनावणीपूर्वी अहवाल देण्यास सांगितले.

शेतकºयांच्या अस्थींचे चंद्रभागेत विसर्जन

सोलापूर – उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसेत मृत झालेले ४ शेतकरी आणि एका पत्रकाराच्या अस्थींचे बुधवारी पंढरपुरातील चंद्रभागा नदीत विसर्जन करण्यात आले. शेतकरी आणि वारकºयांनी दिंडी काढत या अस्थींचे विसर्जन केले. यावेळी पंचक्रोशीतील शेकडो शेतकरी आणि वारकरी उपस्थित होते. शेतकरी आणि वारकºयांनी दिंडी काढून विठू नामाच्या जयघोषात अस्थींचे चंद्रभागेच्या पात्रात विसर्जन केले. त्यापूर्वी या अस्थी नामदेव पायरीवर दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर नामदेव पायरीपासून ते चंद्रभागा घाटापर्यंत दिंडी काढण्यात आली. नंतर विधीवत या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. विठ्ठल हा शेतकºयाचे दैवत आहे. पंढरपुरात येणारा भाविक हा शेतकरीच आहे. शेतकºयांवर होणाºया अन्याय-अत्याचाराविरोधात लढण्यासाठी शेतकºयांना शक्ती मिळावी, असे साकडे यावेळी शेतकºयांनी विठू चरणी घातले, असे शेतकरी नेते विनायक पाटील यांनी सांगितले. विनायक पाटील यांच्या पुढाकारानेच या अस्थी पंढरपुरात आणण्यात आल्या होत्या.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *