मेलबर्न – क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी निक हॉकले यांच्या मते, त्यांच्या संघाने नुकतेच यश प्राप्त केल्यानंतर ही मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांना त्यांचा करार वाढला आहे की, नाही हे जाणून घेण्यासाठी स्थानिक सत्राच्या अखेरपर्यंत वाट पाहावी लागेल.
ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध स्थानिक मालिका गमावण्यासह काही वेळ कठीण काळातून गेल्यानंतर पहिल्यांदा टी-२० विश्वचषक जिंकले व आता ते ॲशेस मालिका जिंकण्याच्या जवळ पोहचलेत. दरम्यान, हॉकले यांनी लँगर यांच्या भविष्याबाबत कोणतेच आश्वासन दिले नाही. ते रविवारी तिसऱ्या ॲशेस कसोटीच्या पहिल्या दिवसानंतर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, माझे मत आहे की लँगर व संपूर्ण सहयोगी स्टाफ खूपच चांगले काम करत आहे. आम्ही पहिल्या दोन कसोटी सामन्याच्यावेळी हे पाहिले. ते पुढे म्हणाले, आम्ही सुरुवातीलाच म्हणालो होतो की, आम्ही वास्तवात दोन स्पर्धांवर लक्ष केंद्रित केले आहे. पहिले टी-२० विश्वचषक व टी-२० संघाने सर्वोत्तम कामगिरी करत जेतेपद पटकावले. हिच गोष्ट ॲशेसवरही लागू होते. मी जेएल (लँगर) यांना ओळखतो, मी संघाला ओळखतो, त्यांनी पूर्णपणे मालिका जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले असेल. आम्ही उन्हाळ्याचे सत्र सुरू होण्यापूर्वी सर्व गोष्टींची समिक्षा करू जेणेकरून पुढील भविष्याबाबत निर्णय घेता येईल.