रोहित शर्मा एक शानदार कर्णधार – गांगुली

मुंबई- भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयनेटी-२० पाठोपाठ एकदिवसीय संघाचे नेतृत्त्व रोहित शर्माकडे सोपविले.या बदलावरून सोशल मीडियावर विराट कोहली विरुद्ध सौरव गांगुली असा वाद चाहत्यांमध्ये सुरू असताना बीसीसीआयच्या अध्यक्षांनी स्पष्टीकरण दिलेआहे. काही वर्षापूर्वी झालेल्या आशिया कप (२०१८) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने विजय मिळवला होता. त्या संघात विराट कोहली नव्हता. कोहली शिवाय संघ जिंकला होता. यावरून स्पष्ट होतेकी रोहितच्या नेतृत्वाखाली आमचा संघ किती मजबूत आहे. रोहित शर्मा एक शानदार कर्णधार आहे. म्हणून तर निवड समितीनेत्याच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. तो संघाला पुढे घेऊन जाईल. आयपीएलमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा विजेतेपद मिळवले आहे. रोहितने मोठ्या स्पर्धेत संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याच्याकडे सर्वोत्तम संघ आहे आणि आशा आहे की तो टीम इंडियाला मोठे यश मिळवून देईल, असे स्पष्टीकरण बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने दिले आहे.
संयुक्त अरब आमिरातील विश्वचषकानंतर टी – २० संघाचे कर्णधार पद सोडणार असल्याचे विराट कोहलीनेजाहीर केले होते, पण एकदिवसीय आणि कसोटी संघाचेकर्णधारपद भूषवण्यास तयार आहोत असेही स्पष्ट केलेहोते. बीसीसीआयने विराटला टी-२० चेकर्णधारपद सोडू नयेअसा सल्ला दिला होता. पण त्यानेतो ऐकला नाही. त्यामुळे निवड समितीनेकोहलीला चांगलाच धक्का दिला.बोर्डाने विराटला राजीनामा देण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली होती, पण विराटकडून काहीच उत्तर न मिळाल्याने अखेर बीसीसीआयनेनिर्णय जाहिर केला. ही निवड बीसीसीआय आणि निवड समितीनेमिळून केली आहे. कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी दोनच कर्णधार असावेत अशी निवड समितीची भूमिका होती.त्यामुळे विराट च्या कर्णधादपदावर गदा आली. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएल करंडक जिंकला आहे.याशिवाय कोहलीच्या अनुपस्थितीत रोहितनेभारतीय संघाचे नेतृत्व करताना आशिया चषक देशाला मिळवून दिला होता.कोहली संघात नसताना भारतीय संघाने जे घवघवीत यश मिळवलेआहेत्याला खूप मोल आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …