* द.आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर
मुंबई- न्यूझीलंडविरुद्धची मालिका दणक्यात जिंकणारा भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज झाला आहे. ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या शिरकावामुळेदौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेजात असताना वेळापत्रकात थोडा बदल करुन दौरा २६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. दरम्यान, दौऱ्यासाठी भारतीय संघानेआपला संघ जाहीर केला असून यावेळी रोहित शर्माचे प्रमोशन झाल्याचेपाहायला मिळत आहे. रोहितकडे तिहेरी जबाबदारी सोपवली आहे.रोहितला टी-२० पाठोपाठ आता एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही सोपविलेआहेशिवाय कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणूनही रोहित काम पाहणार आहे. आज निवड समितीची मोठी बैठक झाली, यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे.
विराटने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर चर्चा सुरू झाली होती की, टी-२० सोबत वनडेचे कर्णधारपद रोहित शर्माकडे दिले जाईल. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहित शर्माचे कौतुक केले आहे. त्याच्या मते रोहित टी-२० सोबत वनडेचा देखील चांगला कर्णधार आहे. टी-२० विश्वचषक संपल्यावर रोहितकडेटी-२० संघाचे कर्णधारपद आले आणि रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडवर विजयही मिळवला. त्यानंतर रोहितकडेभारताच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात यावे, अशी जोरदार चर्चा बीसीसीआयमध्ये सुरु होती. पण त्यानंतर भारतीय संघ लवकर एकदिवसीय मालिका खेळणार नव्हता, त्यामुळे न्यूझीलंडची कसोटी मालिका होईपर्यंत हा विषय थंडावला होता. पण न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका संपली आणि त्यानंतर रोहित शर्माकडे भारताच्या वनडे संघाचे कर्णधारपद जाणार, याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. निवड समितीमध्ये याविषयावर जोरदार चर्चा झाली. कोहली वनडे संघाचे कर्णधारपद सोडण्यास तयार नसल्याचेही वृत्त येत होते. पण अखेर आज निवड समितीने भारताच्या वनडे संघाच्या कर्णधारपदाची माळ रोहित शर्माच्या गळ्यात घातल्याचे पाहायला मिळाले.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने सर्वाधिक वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर आतापर्यंत कोहली नसताना जेव्हा रोहितने भारताचे नेतृत्व केले आहे, तेव्हा रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने दिमाखदार कामगिरी केल्याचे समोर आले आहे. पण आता रोहितकडेच भारताच्या ट्वेन्टी-२० आणि वनडे संघाचे कर्णधारपद आता सोपवण्यात आले आहे. त्यामुळे रोहित आता भारतीय संघाचे कसे नेतृत्व करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
द. आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.
स्टँड बाय प्लेअर – नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्जान नागव्सल्ला
कसोटी सामन्यांचे वेळापत्रक
पहिला कसोटी सामना – 26 डिसेंबर, 2021 ते 30 डिसेंबर, 2021 सुपरस्पोर्ट पार्क, सेन्चुरियन.
दुसरा कसोटी सामना – 3 जानेवारी,2022 ते 7 जानेवीर, 2022 न्यू वांडरर्स मैदान, जोहान्सबर्ग.
तिसरा कसोटी सामना – 11 जानेवारी, 2022 ते 15 जानेवारी, 2022 न्यू लँड्स, केपटाऊन
एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना – 19 जानेवारी, 2022, बोलंड पार्क, पार्ल
दुसरा एकदिवसीय सामना – 21 जानेवारी, 2022, बोलंड पार्क, पार्ल
तिसरा एकदिवसीय सामना – 23 जानेवारी, 2022, न्यू लँड्स, केपटाऊन