रोहित अनफिट : लोकेश राहुलकडे भारतीय संघाची धूरा

मुंबई – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दुखापतीमुळे कसोटी पाठोपाठ रोहित शर्माला वनडे मालिकेलाही मुकावे लागणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलकडे भारतीय संघाची धूरा देण्यात आली आहे. बीसीसीआयने नुकतीच यासंदर्भात घोषणा केली. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला होता.
रोहित शर्माला स्नायूच्या दुखापतीमुळे कसोटीतून माघार घेण्याची वेळ आली. त्याच्या फिटनेसबाबत प्रश्नचिन्ह असल्यामुळे बीसीसीआय वनडे संघ निवडीसाठी वेळ घेत असल्याच्या बातम्या आल्या. अखेर रोहित शर्मा अनफिट असून, त्याच्याशिवायच भारतीय संघ वनडे मालिकेसाठी मैदानात उतरणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियात शिखर धवनला संधी देण्यात आली आहे. श्रीलंका दौऱ्यानंतर पुन्हा एकदा तो टीम इंडियात दिसणार आहे. त्याच्याशिवाय ऋतूराज गायकवाड आणि व्यंकटेश अय्यर या युवा खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे, तर गोलंदाजीमध्ये युजवेंद्र चहल, आर. अश्विन, वाशिंग्टन सुंदर या तिघांचा संघात समावेश असून, जलदगती गोलंदाजीची धूरा ही अनुभवी भुवनेश्वर कुमारसह प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. बुमराहकडे उपकर्णधारपदाच्या जबाबदारीशिवाय संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी असेल.

भारतीय संघ : लोकेश राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतूराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन, युजवेंद्र चहल, आर. अश्विन, वाशिंग्टन सुंदर, जसप्रित बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …