ठळक बातम्या

रोनाल्डोच्या मार्गावर चालला वॉर्नर, पत्रकार परिषदेतून हटवल्या कोका-कोलाच्या बाटल्या

दुबई – ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरने स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पावलांवर पाऊल ठेवत येथे सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकाच्या पत्रकार परिषदेदरम्यान आपल्यासमोर ठेवलेल्या कोका-कोलाच्या बाटल्या काही वेळेसाठी हटवल्या.

ऑस्ट्रेलियाच्या श्रीलंकेवरील ७ विकेटदरम्यान विजयाचा नायक ठरलेल्या वॉर्नरने पत्रकार परिषद सुरू झाल्याच्या काही वेळेतच आपल्यापुढे ठेवलेल्या ‘सॉफ्ट ड्रिंक्स’च्या दोन्ही बाटल्या उचलल्या व हसत म्हणाला की, मी यांना हटवू शकतो का? पण मला या येथेच ठेवायच्या आहेत. त्या दोन्ही बाटल्या तेथेच ठेवत तो म्हणाला, जर हे ख्रिस्तियानोसाठी चांगले आहे, तर माझ्यासाठीही चांगले आहे. हेच योग्य आहे. रोनाल्डोने युरोपिय फुटबॉल चॅम्पियनशीपमध्ये पत्रकार परिषदेत आपल्या जवळील शीतपेयाच्या बाटल्या हटवल्या होत्या व बातम्यांनुसार त्यावेळी त्या कंपनीला चक्क चार अब्ज डॉलरचा तोटा सहन करावा लागलेला. वॉर्नरचा हा बाटल्या हटवण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, पण त्याचा निकाल अद्याप आलेला नाही. फिटनेसला प्राथमिकता देणाऱ्या रोनाल्डोने पोर्तुगालच्या हंगेरीविरुद्धच्या युरो चषक सामन्याआधी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत आपल्यासमोर ठेवलेल्या कोका-कोलाच्या बाटल्या हटवलेल्या. तेव्हा हा ३६ वर्षीय स्ट्राइकर पाण्याची बॉटल उचलत पोर्तुगीज भाषेत म्हणालेला की, ‘एग्वा’. ज्यामुळे असे वाटलेले की, तो लोकांना शीतपेया ऐवजी पाण्याला प्राथमिकता देण्याचा आग्रह करत आहे. ३५ वर्षीय वॉर्नर खराब फॉर्मातून सावरत ४२ चेंडूंत ६५ धावा केल्या, ज्यात १० चौकारांचा समावेश होता.
चौकट –

या खेळपट्टीवर चांगल्या सुरुवातीची गरज
वॉर्नर यावेळी म्हणाला की, धिम्या खेळपट्टीवर फलंदाजी करताना चांगली सुरुवात खूपच महत्त्वपूर्ण आहे. वॉर्नरने आपल्या लयाबाबत सुरू असलेल्या चर्चेला खूपच विनोदी असल्याचे सांगितले, कारण त्याच्या मते, आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादद्वारे बाजूला केल्यानंतर तो जास्त क्रिकेट खेळू शकला नव्हता. तो म्हणाला, मला वाटते की, जी लोक माझ्यावर टीका करीत होते, त्यांना माहीत आहे की, मी कसा आहे. आमच्यासाठी येथे एक चांगली सुरुवात करणे वास्तवात महत्त्वपूर्ण होते. फिंचला चांगले खेळताना व शानदार शॉट ठोकताना पाहून बरे वाटले. तो म्हणतो, माझ्यासोबत देखील हिच प्रक्रिया आहे. अशा खेळपट्ट्यांवर एक चांगली सुरुवात करणे महत्त्वपूर्ण आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …