होबार्ट – जेमिमा रॉड्रिग्सची आक्रमक नाबाद खेळी भारतीय संघातील तिची सहकारी खेळाडू स्मृती मंधानाच्या अर्धशतकी खेळीवर भारी पडली, ज्यामुळे तिचा संघ मेलबर्न रेनेगेड्सने महिला बिग बॅश लीग (डब्ल्यूबीबीएल) मध्ये बुधवारी येथे सिडनी थंडरवर ९ धावांनी विजय नोंदवला. भारतीय महिला संघातील अव्वल फळीतील फलंदाज २१ वर्षीय रॉड्रिग्सने ५६ चेंडूंत ९ चौकारच्या मदतीने नाबाद ७५ धावा केल्या, ज्यामुळे मेलबर्नने ५ बाद १४२ धावांचे आव्हानात्मक धावसंख्या उभारली. भारताच्या वतीने डावाची सुरुवात करणाऱ्या मंधानाने सिडनीसाठी ४४ चेंडूंत ४ चौकार व एक षटकार ठोकत ६४ धावा केल्या, पण त्यांचा संघ २० षटकांत ८ बाद १३३ धावांच करू शकला. या सामन्यात दोन इतर भारतीय टी-२० कर्णधार हरमनप्रीत कौर व स्पिन अष्टपैलू दीप्ति शर्मा खेळत होत्या. या दोघींनी प्रत्येकी एक विकेट मिळवला. हरमनप्रीत फलंदाजीत मोठाली कामगिरी करू शकली नाही. मेलबर्नच्या वतीने खेळणारी हरमनप्रीतने केट पीटरसनच्या गोलंदाजीवर पायचीत होण्यापूर्वी फक्त तीन धावा केल्या होत्या. तिने नव्या चेंडूने गोलंदाजी केली व ४ षटकांत ३५ धावा देत मंधानाचा महत्त्वपूर्ण विकेट मिळवला. दीप्तिने ४ षटकात २३ धावा देत एक विकेट मिळवला व नंतर १० चेंडूंत नाबाद २३ धावा केल्या, पण ती आपला संघ सिडनी थंडरला लक्ष्यापर्यंत पोहचू शकली नाही.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …
One comment
Pingback: 뉴토끼