रॉकी और रानीच्या सेटवरून व्हायरल झाले रणवीर आणि आलियाचे फोटो

रणवीर सिंग आणि आलिया भट्ट सध्या आपला आगामी चित्रपट रॉकी और रानी की प्रेमकहानीमुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात रणवीर सिंग रॉकीच्या, तर आलिया रानीच्या व्यक्तिरेखेत दिसून येणार आहेत. यादरम्यान सोशल मीडियावर चित्रपटाच्या सेटवरून काही फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यात हे दोघेही चित्रपट दिग्दर्शकासोबत दिसून येत आहेत.

आलिया आणि रणवीरचे हे फोटो रणवीर सिंगच्या फॅन पेजने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे फोटो ट्विटरवर शेअर करत फॅनने दावा केला आहे की, हे फोटो रॉकी और रानी की प्रेमकहानीच्या सेटवरील आहेत. या फोटोत आलिया भट्ट ट्रेडिशनल लूक फॉलो करताना कलरफुल साडीत दिग्दर्शक करण जौहर आणि अभिनेता रणवीरबरोबर पोझ देताना दिसून येतेयं. तर रणवीरने जीन्स घातली असून, अंगावर शाल लपेटलेली आहे. या फोटोत सर्व लोक खूप खुश दिसून येतायेत. याआधी दिल्लीच्या सेटवरून एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यात आलिया व रणवीर सेटवरून आपल्या कारच्या दिशेने जाताना हात हलवून चाहत्यांना अभिवादन करताना दिसून आले होते. या चित्रपटाद्वारे या दोघांची जोडी दुसऱ्यांदा ऑनस्क्रिन एकत्र दिसून येणार आहे. यापूर्वी या दोघांनी गली बॉय या चित्रपटात एकत्र काम केले होते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …