रेशन दुकानांमध्ये ५ किलो गहू अन् तांदूळ मोफत योजना सुरूच राहणार!

मुंबई/नवी दिल्ली – कृ षी क्षेत्राच्या दृष्टीने मोदी सरकारच्या वतीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याचा धडाका सुरूच आहे. कृ षी कायदे मागे घेण्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता रेशन दुकानात मिळणाऱ्या गहू-तांदळांबद्दल महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आणखीन ४ महिने नागरिकांना गहू आणि तांदूळ मोफतच दिले जाणार आहे. मार्च २०२२ पर्यंत आहे त्याच दरात या अत्यावश्यक वस्तू मिळणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. कृ षी सुधारणा कायदे मागे घेतल्यानंतर लागलीच धान्यांच्या दराबाबत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. रेशनवरील धान्य विकत देण्याच्या तयारीत सरकार होते, मात्र केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत वेगळाच निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पहिला निर्णय रेशनच्या धान्यांबद्दल घेण्यात आला. मध्यंतरी कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरीबांना ५ किलो गहू-तांदूळ मोफत देण्याची घोषणा केली होती. ही योजना गेल्या १५ महिन्यांपासून सुरू आहे. आता केंद्र सरकारने या योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०२१ पासून मार्च २०२२ पर्यंत ४ महिन्यांची मुदतवाढ या योजनेला देण्यात आली आहे. त्यामुळे गरीबांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …