ठळक बातम्या

रेल्वे चालकाने दह्यासाठी थांबवली ट्रेन

पाकिस्तानातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. याठिकाणी एका रेल्वे चालकाने थांबा नसतानाही मध्यभागी गाडी थांबवली. जर तुम्हाला वाटत असेल की, ड्रायव्हरने हे सुरक्षेसाठी केले असेल, तर तुम्ही चुकीचे आहात. वास्तविक, रेल्वे चालकाने दही खाण्यासाठी गाडी थांबा नसतानाही थांबवली.
पाकिस्तानी कधी कधी त्यांच्या हास्यास्पद कृत्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात येतात. पाकिस्तानचा नेता असो वा सामान्य माणूस, त्यांच्यात मूर्खपणा आढळतो. आता पाकिस्तानातील एका रेल्वे चालकाचे मूर्खपणाचे कृत्य समोर आले आहे. पाकिस्तानी ट्रेन चालकाचे हे कृत्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या चालकाने गाडीचा थांबा नसतानाही गाडी थांबवली. त्याला याचे कारण विचारले असता चालकाला दही खायचे असल्याने असे केल्याचे समोर आले. त्याने लोको पायलटला दही खरेदी करण्यासाठी ट्रेन थांबवल्याचे कारण सांगितले आहे.

या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या लाहोरमध्ये धावणाºया इंटर-सिटी ट्रेनच्या चालकाने अचानक ट्रेन थांबवली. ट्रेनने प्रवास करणाºया लोकांना हे समजले नाही की ट्रेन थांबा नसतानाही का थांबली आहे. काफूमध्ये ट्रेन बराच वेळ थांबल्यावर लोकांनी या प्रकरणाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान ट्रेन थांबवण्याचे कारण समजल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. वास्तविक ही गाडी चालवणाºया चालकाला अचानक दही खावेसे वाटले. आपली हौस भागवण्यासाठी ड्रायव्हरने एका डेअरीच्या दुकानासमोर ट्रेन थांबवली. ड्रायव्हरचा असिस्टंट खाली उतरला, दह्याचा डबा भरला आणि परत ट्रेनमध्ये आला. दही खाऊनच ड्रायव्हरने ट्रेन सुरू केली. त्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये अनेक लोक ट्रेनसमोर चौकशीसाठी उभे असल्याचे दिसले.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांनाही याची माहिती मिळाली. याबातमीच्या आधारे त्यांनी तातडीने कारवाई केली. ट्रेन चालकाला निलंबित करण्यात आले आहे. रेल्वेमंत्री म्हणाले की, सार्वजनिक वाहतूक ही जनतेच्या सोयीसाठी आहे. चालकाला त्याच्या वैयक्तिक कामासाठी ती थांबवता येत नाही. भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी चालकाला शिक्षा करणे अत्यंत गरजेचे होते. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानची खिल्ली उडवली जात आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …