विमानांच्या धर्तीवर पुरवणार सेवा
पुरुषांनाही मिळणार संधी
नवी दिल्ली – पुढील काही दिवसांत भारतीय रेल्वेच्या शताब्दी, गतिमान, तेजस एक्स्प्रेस अशा गाड्यांमध्ये ट्रेन होस्टेसची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विमानांतील सेवांच्या धर्तीवर ही सुविधा देणार असल्याचे आयआरसीटीसी अर्थात इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने म्हटले आहे.
सूत्रांनुसार, भारतीय रेल्वेकडून सध्या २५ प्रीमियम गाड्या संचालित करण्यात येत आहेत. यात शताब्दी, राजधानी, गतिमान, तेजस आणि वंदे भारत अशा गाड्यांचा समावेश आहे. पुढील काही दिवसांमध्ये दिवसा धावणाºया प्रीमियम गाड्यांत ट्रेन होस्टेस सेवा उपलब्ध केली जाणार आहे. यात १२ शताब्दी, २ वंदे भारत, १ गतिमान आणि एक तेजस एक्स्प्रेसचा समावेश आहे. राजधानी आणि दुरंतोमध्ये ही सुविधा उशिरा सुरू होईल.
हा निर्णय घेताना रेल्वेने महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यावर भर दिला आहे. अन्य क्षेत्रांप्रमाणेच रेल्वेतही महिला पुढे येऊ शकतात, हा यामागील हेतू आहे. प्रवासकाळात चांगल्या सुविधा देण्यासाठी हा बदल असून, पुरुषांच्या तुलनेत महिला विभाग चांगली सेवा देत असतात. विमानांतील सेवा हे त्याचे मोठे उदाहरण असल्याचे आयआरसीटीसीने म्हटले आहे. दरम्यान, केवळ महिलांनाच संधी मिळणार नसून, पुरुषांनाही होस्टेस म्हणून संधी देण्यात येणार आहे. ज्या प्रीमियम गाड्या १२ ते १८ तासांचा प्रवास करतात, अशाच गाड्यांत ही सेवा पुरवणार असल्याचे आयआरसीटीसीच्या अधिकाºयाने सांगितले.
One comment
Pingback: ราคาแบตเตอรี่รถยนต์