मुंबई – रुळांची, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी रविवार, १२ डिसेंबर रोजी मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुलुंड व दिवा स्थानकांदरम्यान अप व डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम होणार आहे. या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या लोकल मुलुंड व दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. तसेच या कालावधीत कळवा व मुंब्रा स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत. तर कल्याण स्थानकातून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल दिवा व मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. या कालावधीत कळवा व मुंब्रा स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत.
हार्बर मार्गावर पनवेल-वाशी स्थानकांदरम्यान अप व डाऊन मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. दरम्यान, बेलापूर व खारकोपर स्थानकांदरम्यान लोकल सुरू असून, नेरूळ-खारकोपर स्थानकांदरम्यान लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. दुरुस्तीच्या कालावधीत पनवेल स्थानकातून ठाण्यासाठी सुटणाऱ्या व ठाणे स्थानकातून पनवेल स्थानकात जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल-वाशी स्थानकांदरम्यान सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कालावधीत सीएसएमटी-वाशी स्थानकांदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येत आहेत. तसेच ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे, वाशी व नेरूळ स्थानकांदरम्यान लोकल सुरू आहेत. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यानच्या लोकल धिम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …