रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष


  • मुंबई – राज्य महिला आयोगाला अखेर दीड वर्षानंतर अध्यक्ष मिळाला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृ त निवड करण्यात आली आहे. निवडीबाबतचे पत्र रुपाली चाकणकर यांना बुधवारी मिळाले. रुपाली चाकणकर अध्यक्षपदाची सुत्रे गुरुवारी स्वीकारणार आहेत. ४ फेब्रुवारी, २०२० रोजी विजया रहाटकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, तेव्हापासून हे पद रिक्त होते. राज्यात गेल्या काही दिवसांत महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. अशावेळी भाजप आणि अन्य विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला जात होता. महिला सुरक्षेबाबत हे सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला जात होता. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त असल्यामुळे राज्य सरकारवर अनेकदा टीकास्त्र डागले होते. अशावेळी अखेर ठाकरे सरकारने रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृ त निवड केली आहे.
    विजया रहाटकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. आयोगाचे अध्यक्षपद हे राजकीय स्वरूपाचे नसल्याचे सिद्ध झाले आहे. हा माझ्या अराजकीय भूमिकेचा नैतिक विजय आहे, त्यामुळे आता हे पद स्वत:हून सोडण्याचा निर्णय घेतल्याचे विजया रहाटकर यांनी पत्रात म्हटले होते. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालामध्ये अनावश्यक राजकीय शेरेबाजीविरोधात मी सवार्ेच्च न्यायालयात धाव घेतली होती. सवार्ेच्च न्यायालयाने अध्यक्षपदाच्या नियुक्तीबाबत आणि पदावरून काढण्याबाबत आयोगाच्या कायद्यातील तरतुदींचा मुद्दा विचारार्थ ग्राह्य धरलेला आहे. एका अर्थाने आयोगाचे अध्यक्षपद राजकीय स्वरूपाचे नसून, त्याबाबत राज्य सरकारला कायद्यानुसारच विहीत प्रक्रिया करावी लागेल, असेच स्पष्ट झाले आहे. हा माझ्या अराजकीय भूमिकेचा नैतिक विजय आहे. त्यामुळे आता हे पद मी स्वत:हून सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि राजीनामापत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले, अशी प्रतिक्रिया विजया रहाटकर यांनी दिली होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published.