पनवेल – ठाण्याचा युवा रुद्रांक्ष पाटीलने येथे १२ वे आर. आर. लक्ष्य चषक २०२१ अखिल भारतीय आमंत्रण १० मीटर एअर रायफल नेमबाजी स्पर्धेत सीनियर गटातील जेतेपद आपल्या नावे केले. लक्ष्य शूटिंग क्लबद्वारे या एकदिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले. रुद्रांक्षने या महिन्याच्या सुरुवातीला भोपाळमध्ये ६४ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत रौप्य पदक जिंकलेले. त्याने या स्पर्धेत सुरुवातीपासून आघाडी मिळवली होती. त्याने २५१.८ च्या स्कोरने एक गुणाने पहिले स्थान प्राप्त केले. अशाप्रकारे त्याने एक लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक प्राप्त केले. नौसेनेचा किरण जाधव २५०.८ गुणांसह दुसऱ्या स्थानी राहिला, तर उत्तर प्रदेशची आयुषी गुप्ता तिसऱ्या स्थानी राहिली. मागील वर्षी आर. आर. लक्ष्य चषक विजेता टोकियो ऑलिम्पियन ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर यंदा सहाव्या स्थानी राहिला. ज्युनियर गटाचे सुवर्ण पदक नाशिकचा नेमबाज आर्या बोरसेने नवी मुंबईच्या मयुरी पवारला पिछाडीवर टाकत प्राप्त केले.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …