रुग्णांची संख्या २० हजारांवर गेल्यास मुंबईत लॉकडाऊन


मुंबई – मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील रुग्णांची दिवसभरातील संख्या २० हजारांवर गेल्यास मुंबईत लॉकडाऊन करावाच लागेल, असे मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी स्पष्ट सांगितले आहे.
मुंबईत ३ जानेवारीला ८ हजार ८२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, सोमवारी ६२२ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर इक्बाल चहल यांनी महत्त्वाचा इशारा दिला आहे. मुंबईतील रुग्णसंख्या अशीच वाढत राहून एका दिवसात २० हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यास लॉकडाऊन करावेच लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
इक्बाल चहल यांनी मुंबई महापालिका वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाल्याचे सांगितले. मुंबईचे कौतुक सर्व स्तरात झाले होते. यामध्ये सर्वांचे योगदान होते; मात्र आता ओमिक्रॉन वाढत आहे. आता मुंबईचा कोरोना आकडा आठ हजारांवर गेला आहे. नागरिकांनी आपल्याला कोरोनापासून दूर कसे राहता येईल हे पाहावे, असे आवाहन इक्बाल चहल यांनी केले आहे. महापालिकेकडे ३० हजारांपेक्षा जास्त खाटा सध्या उपलब्ध आहेत. तीन हजार खाटा सध्या भरलेल्या आहेत. औषधे आहेत, व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत, सगळी तयारी आमची झालेली आहे, असेही ते म्हणाले.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …