अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर हिच्या फॅशन सेन्स आणि स्टाईल स्टेटमेंटशी सर्वचजण परिचित आहेत. सोनम नेहमीच आपल्या उंची पोशाखांनी चाहत्यांची मने जिंकून घेत आली
आहे. अनेकदा तिला तिच्या कपड्यांवरून ट्रोलही व्हावे लागले आहे तो भाग वेगळा, परंतु आता तिची बहीण रिया कपूरही सोशल मीडियावरील त्या सेलिब्रेटींमध्ये दाखल होऊ लागली
आहे. ज्या आपल्या अनोख्या अंदाजांनी चाहत्यांना दिवाने करून सोडतात. रियाची फॅशन पाहून चाहत्यांची मनोवस्थाही अशीच काहीशी झाली आहे.
रियाने अलीकडेच वोगसाठी एक फोटोशूट करून घेतले आहे. त्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत तिने क्लीव्हेज गाऊन घातलेला दिसून येतोय, जो घालून रियाने
वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. हलक्या आकाशी रंगाच्या गाऊनमध्ये रिया अतिशय सुंदर दिसत आहे. या फोटोवर अनेक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. इंडस्ट्रीतील तिच्या फ्रेंड्सनी तसेच
तिला ओळखणाºयांनी तिचे कौतुक केले आहे, तर फॉलोअर्स देखील रियाचा अंदाज पाहून हैराण झाले आहेत. एका युजरने याला वर्षातील सर्वात चांगला फोटो म्हटले आहे, तर अन्य
एका युजरने लिहिले आहे, ‘तू फोटोपेक्षाही जास्त सुंदर दिसतेस.’ अनेक लोकांनी रियाच्या हॉटनेसचे कौतुक केले आहे. अनेक युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये हार्ट आणि फायर इमोजीची
तर बरसातच केली आहे. रियाने यावर्षीच लाँग टाईम बॉयफ्रेंड करण बलूनीबरोबर विवाह केला होता. रिया बॉलीवूड चित्रपट प्रोड्यूस करते व एक मजबूत स्त्री म्हणून ओळखली जाते.
२०१० मध्ये तिने आयशाद्वारे डेब्यू केले होते.