कानपूर – भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी सध्या कानपूरमध्ये खेळली जात आहे. या कसोटीमध्ये मैदानात उतरण्यापूर्वीच टीम इंडियाचा विकेट किपर रिद्धीमान साहा याने एक मोठा रेकॉर्ड केला आहे. गेल्या ७५ वर्षांत कोणत्याही भारतीयाला न जमलेली कामगिरी त्याने केली आहे. रिद्धीमान साहा १९४६ नंतर टीम इंडियाकडून कसोटी सामना खेळणारा सर्वात ज्येष्ठ विकेट किपर बनला आहे. साहाचे वय सध्या ३७ वर्षे ३२ दिवस आहे. त्याने कानपूर कसोटीमध्ये माजी भारतीय विकेट किपर फारूख इंजिनीअर यांना मागे टाकले आहे. इंजिनीअर यांनी ३६ वर्षे ३३८ दिवस वय असताना टीम इंडियाकडून कसोटी सामन्यामध्ये विकेट किपिंग केली होती. भारताकडून हा रेकॉर्ड दत्ताराम हिंदळेकर यांच्या नावावर आहे. त्यांनी ३७ वर्षे २३१ दिवस वय होते तेव्हा शेवटचा कसोटी सामना खेळला होता. साहाला कानपूर कसोटीमध्ये बॅटिंगने काही कमाल करता आली नाही. तो फक्त एक धाव काढून बाद झाला. बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या साहाने २०१० साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नागपूरमध्ये झालेल्या कसोटीमध्ये पदार्पण केले होते. पण, त्याला आधी महेंद्रसिंह धोनी आणि आता ऋषभ पंत यांच्यामुळे कायमच स्टँडबायची भूमिका करावी लागली आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …