ठळक बातम्या

रितेश देशमुखची नवीन ईिनंग सुरु


हिंदी सिनेमामध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी एक यशस्वी अभिनेता म्हणून नाव कमावल्यानंतर आपला मोर्चा दिग्दर्शनाकडे वळवला. या कलाकारांच्या यादीत आता रितेश देशमुखही दाखल झाला आहे. तब्बल 20 वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आलेल्या रितेशने आता दिग्दर्शनात उतरत असल्याची घोषणा केली आहे. रितेशच्या या नव्या ईिनंगची सुरुवात मराठी चित्रपटाद्वारे होणार आहे. याबाबतची घोषणा रितेशने चित्रपटाचे टायटल जाहीर करुन केली आहे.
दिग्दर्शक म्हणून रितेश करत असलेल्या या चित्रपटाचे टायटल वेड आहे. चित्रपटाचे टायटल रिव्हील करताना रितेशने लिहिले आहे,’ 20 वर्षे कॅमेऱ्यासमोर राहिल्यानंतर आता पहिल्यांदाच कॅमेऱ्यामागे जाणार आहे. आपल्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यापूर्वी अगदी विनम्रपूर्वक आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद मागत आहे. वेडाने भरलेल्या या प्रवासात सहप्रवासी बना. ‘ हा चित्रपट पुढील वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने 12 ऑगस्ट रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. ही एक म्युझिकल ड्रामा फिल्म आहे, ज्याचे संगीत सैराट फेम अजय-अतुल देणार आहेत. या चित्रपटात जिया शंकर, जिनिलिया देशमुख व स्वत: रितेश लीड रोलमध्ये पहायला मिळणार आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …