ठळक बातम्या

राहुल द्रविडच्या कोचिंगबाबत इतक्यात भाष्य करता येणार नाही – अश्विन

मुंबई – राहुल द्रविड भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा प्रशिक्षक बनला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात यश मिळवून त्याचा प्रवास सुरू झाला आहे. द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक बनल्यापासून तो सतत मीडियामध्ये चर्चेत आहे. टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन म्हणाला की, आताच राहुल द्रविडच्या कोचिंग स्टाइलवर भाष्य करणे खूप घाईचे ठरेल. त्यावर सध्या भाष्य करता येणार नाही. मात्र या दिग्गज खेळाडूच्या मार्गदर्शनामुळे ड्रेसिंग रूममध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल, असा विश्वास त्याने व्यक्त केला. द्रविडची रवी शास्त्रींच्या जागी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली गेली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सध्याच्या टी-२० मालिकेपासून त्याचा कार्यकाळ सुरू झाला आहे. याआधी तो श्रीलंका दौऱ्यावरही भारताचा प्रशिक्षक होता, मात्र तेव्हा त्याने काळजीवाहू म्हणून जबाबदारी स्वीकारली होती.
बुधवारी भारताने न्यूझीलंडवर ५ विकेट्सनी विजय मिळवला, त्यानंतर क्रीडा वृत्तवाहिनीशी बोलताना अश्विन म्हणाला, ‘राहुल द्रविडच्या कोचिंग स्टाईलवर सध्या भाष्य करणे माझ्यासाठी खूप घाईचे आहे, परंतु त्याने अंडर-१९ स्तरापासूनच त्याचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. तो बऱ्याच गोष्टी नशिबावर सोडत नाही, त्याऐवजी तयारी आणि प्रक्रियेवर त्याचा विश्वास आहे, जेणेकरून आम्ही भारतीय ड्रेसिंग रूममध्ये आनंद परत आणू शकू’. अश्विनने ४ वर्षे संघाबाहेर (मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये) राहिल्यानंतर अलीकडेच भारताच्या टी-२० संघात पुनरागमन केले आहे. अश्विनला २०१७ पासून मर्यादित षटकांचा एकही सामना खेळायला मिळाला नाही. अलीकडेच त्याने संघाच्या इंग्लंड दौऱ्यावरही प्रेक्षकाची भूमिका बजावली होती. अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्याची संधी मिळाल्यावर त्याने टी-२० विश्वचषकादरम्यान संघात पुनरागमन केले. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठीही तो भारतीय संघाचा भाग आहे. आणि बुधवारी पहिल्या सामन्यात त्याने दोन विकेट घेतल्या.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …