ठळक बातम्या

‘राहुल गांधी भ्रमात आहेत, पुढील अनेक दशके भाजपचेच वर्चस्व’ प्रशांत किशोर यांचे भाकीत

‘राहुल गांधी भ्रमात आहेत, पुढील अनेक दशके भाजपचेच वर्चस्व’

प्रशांत किशोर यांचे भाकीत
नवी दिल्ली – पुढील अनेक दशके भारतीय राजकारणावर भाजपचे वर्चस्व राहणार आहे आणि मोदी युग संपण्याची वाट पाहणे ही काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चूक आहे, असे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. प्रशांत किशोर यांनी गोव्याच्या दौºयावर असताना ही प्रतिक्रिया दिली आहे. प्रशांत किशोर यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांना पुढील अनेक दशके भाजपशी लढावे लागणार आहे. प्रशांत किशोर सध्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी काम करत आहेत.
आगामी गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूलसाठी गोव्यात पोहोचले आहेत. अनेक दशके भाजपच्या वर्चस्वाचा अंदाज वर्तवण्याबरोबरच प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींचीही खिल्ली उडवली आणि म्हणाले की, राहुल गांधी भाजप केवळ मोदी लाटेपर्यंतच सत्तेत राहणार आहे या भ्रमात आहे. गोव्यात म्युझियममधील एका कार्यक्रमादरम्यान प्रशांत किशोर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. भाजप जिंकेल किंवा हरेल, पण काँग्रेसच्या ४० वर्षांच्या कारभाराप्रमाणेच ते भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी राहतील. भाजप कुठेही जाणार नाही. तुम्हाला भारतात ३० टक्के मते मिळाली की, तुम्ही इतक्या लवकर कुठेही जाणार नाही. त्यामुळे लोक संतप्त होऊन मोदींना उखडून टाकतील या चक्रव्यूहात कधीही पडू नका. लोक मोदींना हटवू शकतात, पण भाजप कुठेही जाणार नाही. पुढील अनेक दशके तुम्हाला भाजपचा सामना करावा लागेल, असे प्रशांत किशोर म्हणाले.
राहुल गांधींची हीच अडचण आहे. बहुधा, त्यांना असे वाटते की, ही फक्त थोड्या वेळेची बाब आहे, जोपर्यंत लोक मोदींना सत्तेवरून घालवत नाहीत, तोपर्यंत ते होणार नाही. जोपर्यंत तुम्ही मोदींची ताकद समजून घेत नाही आणि त्यांची ताकद स्वीकारत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांचा सामना करू शकणार नाही. मला दिसत असलेली अडचण अशी आहे की, लोक मोदींची शक्ती समजून घेण्यास जास्त वेळ देत नाहीत, त्यांना समजत नाही की, मोदी इतके लोकप्रिय कसे होत आहेत. जर तुम्हाला हे माहीत असेल, तरच तुम्ही त्यांचा सामना करू शकाल, असे प्रशांत किशोर म्हणाले.
तुम्ही काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याकडे जा, ते तुम्हाला सांगतीलही थोड्या वेळेची गोष्ट आहे. ही काळाची बाब आहे, लोक कंटाळले आहेत, सत्ताविरोधी लाट येईल आणि लोक मोदींना हटवतील. मला शंका आहे, असे होणार नाही. मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आणि तरीही त्यांच्याविरोधात मोठा जनक्षोभही निर्माण झालेला नाही, याचे उदाहरणही प्रशांत किशोर यांनी दिले.

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …