राहुल आणि रोहित लवकरच विश्वचषक जिंकून देतील – गंभीर

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघ टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता पुढील वर्षी आॅस्ट्रेलियात होणाºया टी-२० विश्वचषकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेनंतर भारतीय संघात अनेक बदल होणार आहेत. या दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने एक वक्तव्य केलं असून, सध्या त्याचीच चर्चा सुरू आहे. भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांची जोडी भारतीय संघाला लवकरच विश्वचषक जिंकून देऊ शकते, असा विश्वास गंभीरने व्यक्त केला आहे.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी-२० विश्वचषकानंतर संपुष्टात येत आहे. त्यामुळे टी-२० विश्वचषकानंतर राहुल द्रविड भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. शास्त्रींप्रमाणेच कर्णधार म्हणून विराट कोहलीची देखील ही शेवटची स्पर्धा आहे. टी-२० विश्वचषकानंतर या फॉरमेटमधील संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे त्याने आधीच जाहीर केले होते. विराट कोहलीनंतर संघाची सूत्रे रोहित शर्माच्या हाती जाण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा टी-२० संघाचा कर्णधार होण्याच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आणि राहुल द्रविडची जोडी कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून पाहायला मिळू शकते. या नव्या जोडीबाबत गौतम गंभीरने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित-द्रविडची जोडी संघासाठी आयसीसी विजेतेपद मिळवून देऊ शकते, अशी आशा गंभीरने व्यक्त केली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …