मुंबई- टीम इंडियाच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपविली. त्यामुळे रिक्त झालेल्या एकदिवसीय संघाची उपकर्णधार पदाची जबाबदारी केएल राहुलच्या खांद्यावर मोठी जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे.
न्यूझीलंड विरुद्ध मागील महिन्यात झालेल्या टी-२० मालिकेत राहुलला संघचा उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. राहुलनेगेल्या काही वर्षात जोरदार खेळ केला आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे भविष्यात कर्णधार होण्याची त्याला संधी आहे. टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविडसह रोहित शर्माआणि विराट कोहली यांच्याकडून त्याला बरंच काही शिकायला मिळणार आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं दिली आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा अद्याप झालेली नाही. या टीमच्या निवडीच्या वेळी राहुलच्या नव्या जबाबदारीची अधिकृत घोषणा होऊ शकते. राहुलने गेल्या दोन वर्षातील एकदिवसीय प्रकारात टीम इंडियाकडून सर्वात जास्त धावा केल्या आहेत. या कालावधीत त्यानं१२ सामन्यात ६२ च्या सरासरीने ६२० धावा केल्या आहेत. यामध्ये२ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. राहुल आयपीएल स्पर्धेतही सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यानं गेल्या चार सिझनमध्येप्रत्येक वेळी ५०० पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत. त्याने आयपीएल २०२१ मधील १३ सामन्यामध्ये६३ च्या सरासरीने६२६ धावा केल्या. यामध्ये६ अर्धशतकांचा समावेश होता.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …