राहुलकडून पाच गोलंदाजांसोबत खेळण्याचे संकेत, रहाणे व अय्यर यांच्यात निर्णय घेणे कठीण


सेंच्युरियन – भारतीय उपकर्णधार के. एल. राहुलने शुक्रवारी संकेत दिले की, भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीमध्ये पाच गोलंदाजांच्या रणनीतिला कायम राखेल, पण त्याने स्वीकारले की, पाचव्या क्रमांकासाठी अजिंक्य रहाणे व श्रेयस अय्यर यांच्यात निर्णय घेणे कठीण असेल.  भारत रविवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेआधी येथे एक आठवड्यांचा सराव करत आहे. नवनियुक्त उपकर्णधाराच्या मते, दक्षिण आफ्रिकेत लय प्राप्त करण्यासाठी चांगल्या सुरुवातीची गरज आहे, जिथे मी केव्हाच कसोटी सामना खेळलेला नाही. हे विचारल्यावर की, चार गोलंदाजांना खेळवणे संघासाठी कार्यभार व्यवस्थापनासाठी अडचण बनू शकते? तर त्याने सकारात्मक उत्तर दिले. ऑनलाइन पत्रकार परिषदेत राहुल म्हणाला की, प्रत्येक संघ कसोटी सामना जिंकण्यासाठी २० विकेट घेऊ इच्छिते. आम्ही देखील या रणनीतिचा वापर केला आहे. त्यामुळे परदेशातही जे देखील सामने खेळलो, तेव्हा आम्हाला त्याची मदत मिळाली. राहुलने यावेळी स्पष्ट केले की, चौथा वेगवान गोलंदाज खेळेल. तो म्हणाला, पाच गोलंदाजांमुळे कार्यभार व्यवस्थापन थोडे सोपे होते व आपल्याकडे असे खेळाडू असतील तर आपण त्यांचा वापर करणे गरजेचे आहे. शार्दुल ठाकूर आपल्यातील चांगल्या फलंदाजी कौशल्यामुळे सीनियर गोलंदाज इशांत शर्मावर प्राधान्य मिळवू शकतो. याचा अर्थ असा की, अय्यर, रहाणे व हनुमा विहारीपैकी एकालाच खेळण्याची संधी मिळेल, कारण राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली व ऋषभ पंतची निवड निश्चित आहे. राहुल म्हणतो, निश्चितपणे याबाबत निर्णय करणे कठीण आहे. अजिंक्यबाबत बोलायचे झाले तर तो कसोटी संघातील महत्त्वाचा सदस्य राहिला आहे, ज्याने आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण खेळी केल्यात. मागील १५ ते १८ महिन्यांत त्याची प्रचिती येते. लॉर्ड्समधील पुजारासोबतची त्याची भागिदारी आमच्यासाठी कसोटी सामना जिंकण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होती. तसेच श्रेयसने निश्चितपणे आपल्या संधीचा फायदा घेतला व कानपूरमध्ये एक शानदार शतकासह एक शतक झळकावले. हनुमाने देखील असेच केले असून यापैकी कोणाला निवडायचे ही कठीण प्रक्रिया असेल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …