राष्ट्रीय संपत्ती विकणे हा कोणता राष्ट्रवाद?; कन्हय्या कुमार यांचा मोदींवर निशाणा

गोवा (पणजी) – जनतेचा पैसा हा नरेंद्र मोदींच्या सुटबुटावर खर्च होतो. भाजप आपल्या जाहिरातबाजीसाठी जनतेचा पैसा खर्च करत आहे. यांचे पुन्हा एकदा सरकार आल्यानंतरही तुमच्याच टॅक्सच्या पैशांतून पैसा वसूल करण्याचे काम त्यांनी केले आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे युवानेते कन्हय्या कुमार यांनी केला आहे. ते गोव्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय इत्यादी समाज घटकांसमवेत बहुजन संवाद या उपक्रमाच्या अंतर्गत स्नेहसंवाद करण्यासाठी म्हापसा येथील टॅक्सी स्थानकावर आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले, काँग्रेसला माझी गरज नाही, तर मला काँग्रेसची गरज आहे. काँग्रेस जनमानसात रुजलेला देशव्यापी पक्ष आहे. देशाचा इतिहास खूप मनापासून वाचला, काँग्रेसचा विचार हाच खरा देशाचा विचार आहे. ज्यांना देश वाचवायचा असेल, त्यांनी काँग्रेस विचार अवलंबने गरजेचे आहे. ज्यांनी या देशात संस्था उभारल्या, पायाभूत सुविधा निर्माण केल्या, त्यांना त्याची किंमत असते. म्हणून काँग्रेस कायमच बीएसएनएल, रेल्वे, एअर इंडिया वाचविण्यासाठी अग्रभागी आहे. भाजपने देशाला काहीच दिले नाही, त्यामुळे ते केवळ या गोष्टी खासगीकरण करून विक्रीत काढत आहेत. देशाच्या नावाने देशातील उद्योजक मोठे करण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत, अशी टीकादेखील यावेळी कन्हय्या कुमार यांनी केली. तसेच राज्यातील सर्वच यंत्रणा भाजपने सत्तेच्या दबावात आपल्या ताब्यात ठेवल्या असून, पैशांच्या जोरावर भाजप निवडणुका जिंकत आहे, असा आरोपही कन्हय्या यांनी केला आहे. सर्व स्वतंत्र असणाऱ्या सर्वच यंत्रणांना भाजपने आपल्या मतानुसार वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भविष्यात आपल्याला मतदान करण्याचा हक्कही उरतो की नाही अशी शंकाही कुमार यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …