द फॅमिली मॅन फेम शारिब हाश्मीने अलिकडेच आपल्या व्यक्तीरेखेसाठी बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरचा पुरस्कार पटकावला आहे. पुरस्कार घेताना शारिब स्टेजवर आपल्या पत्नीसमवेत गेला आणि त्याने आपल्या साऱ्या यशाचे श्रेय पत्नी नसरीन हाश्मी हिला दिले. या निमित्ताने झालेल्या एका मुलाखतीत शारिबने आपला अभिनय प्रवास, पुरस्काराचा आनंद तसेच ओटीटी या माध्यमावर मोकळेपणाने चर्चा केली.
पुरस्काराविषयी बोलताना शारिब म्हणाला,’ पुरस्कार हे तर माझे लहाणपणीचे प्रेम आहे. जेव्हा छोटा होतो तेव्हा मी नेहमी ॲवॉर्ड शो पाहून प्रचंड उत्साहित व्हायचो. मला वाटते की पुरस्कार मिळाल्यानंतर व्यक्तीचा सन्मान आणि आदर यामध्ये कमालीची वाढ होते. मी नेहमी स्वप्नं पहायचो की कधीतरी मी फिल्मफेअर पुरस्कार घेत आहे. आता कुठे हे स्वप्न पूर्ण झाले परंतु अजूनही वाटतेयं की मी स्वप्नचं पहातोय. माझ्याकरिता पुरस्कार हा खूप महत्त्वाचा आहे. असे बिल्कुल नाहीयं की मला पुरस्कार मिळाले नाहीत. तर मी खंत न वाटून घ्यावी. यार खूप वाईट वाटते अन्य कुणाला तरी पुरस्कार घेताना पाहून. खरेतर आपल्याला मूव्ह ऑन करावे लागते. आपण एकाच जागी उभे राहून तक्रार नाही करु शकत. आपल्या कामाला सन्मान दिला जातोय हाच विचार करुन खूप आनंद होतो. मला आठवते की एका लोकप्रिय ॲवॉर्ड शोमध्ये फिल्मितानला ज्या कॅटगरीमध्ये ठेवण्यात आले होते ते पाहून मला पूर्ण खात्री झाली होती की हा पुरस्कार मलाच मिळणार आहे. परंतु जेव्हा नाही मिळाला तेव्हा खूप दु:ख झाले होते.’
शारिब पुढे म्हणाला, ‘ प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते की त्याने आयुष्यात एकदा तरी राष्ट्रीय पुरस्कार मिळवावा. मी तडफडत आहे की असे काही तरी करु की तिथपर्यंत मी पोहोचू शकेल. स्वत:ला इतके लायक बनवेल की राष्ट्रीय पुरस्कार मिळवू शकेल. खरेतर याकरिता अद्याप कुठली सुरुवात केलेली नाहीयं परंतु मला पूर्ण विश्वास आहे की एके दिवशी हे स्वप्नही नक्कीच पूर्ण करु शके
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …
2 comments
Pingback: สินเชื่อโฉนดที่ดิน ที่ไหนดี
Pingback: ข่าวกีฬา