राष्ट्रीय नेमबाजीत ठाण्याच्या रुद्राक्षची ‘पाटिल’की


तिन्ही प्रकारांत जिंकली रौप्यपदके
भोपाळ – मध्य प्रदेश येथील भोपाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ६४ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारामध्ये वरिष्ठ, कनिष्ठ आणि युवा या तिन्ही गटात ठाण्यातील रुद्रांक्ष पाटील याने रौप्यपदके पटकावली आहेत. रुद्रांक्षच्या कामगिरीचे ठाणेकरांकडून कौतुक केले जात आहे.
भोपाळ येथे राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा सुरू आहे. शुक्रवारी झालेल्या १० मीटर एअर रायफल प्रकारामध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी करत वरिष्ठ, कनिष्ठ आणि युवा या तिन्ही गटातील प्रकारामध्ये रौप्य पदकाची कामगिरी केली. यापूर्वी रुद्रांक्षने पेरू येथील कनिष्ठ गटातील जागतिक स्पर्धा जिंकली होती. करोनाच्या कालावधीतही सरावामध्ये त्याने खंड पडू दिला नाही. राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेच्या कालावधीत त्याची परिक्षाही सुरू होती. अशा परिस्थितीतही त्याने पदके पटकावले, असे रुद्रांक्ष याचे वडिल बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …