उना – ३१व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोर संघाने पंजाब व छत्तीसगडवर तर किशोरी संघाने केरळवर विजय मिळवत विजयी घोडदौड कायम राखली. सोमवारी किशोरांच्या सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने पंजाबवर विजय मिळवताना १८-०७ असा एक डाव ११ गुणांनी धुव्वा उडवला. महाराष्ट्राच्या आशिष गौतमने नाबाद ३:४० मि. संरक्षण केलं, अथर्व पाटीलने ३:०० मि. संरक्षण करून ३ गडी बाद केले. जितेंद्र वसावेने २:४० मि. संरक्षण करून ३ गडी बाद केले. सोत्या वळवीने ४ गडी बाद करून संघाला मोठा विजय मिळवून दिला, तर पंजाबच्या सन्नी (३ गडी) व गुविंदर सिंग (२ गडी ) यांनीच चांगला खेळ केला. महाराष्ट्राच्या दुसऱ्या सामन्यात किशोर संघाने छत्तीसगडचा १७-०७ असा एक डाव १० गुणांनी पराभव केला. यामध्ये महाराष्ट्राच्या आराध्य वसावेने २:२० मि. संरक्षण करत ४ गडी बाद केले. त्याला अर्थव पाटीलने नाबाद २:४० मि. संरक्षण करत ३ गडी बाद करून चांगली साथ दिली, तसेच मोहन चव्हाणने २:५० मि. संरक्षण केले आणि जिशान मुलाणीने ३ गडी बाद केले. पराभूत छत्तीसगडतर्फे यशवंत कुमारने केलेले खेळ वगळता अन्य कोणालाही चांगला खेळ करता आला नाही. किशोरी गटात महाराष्ट्राने केरळ संघावर २५-०५ असा एक डाव २० गुणांनी मात केली. महाराष्ट्राने पहिल्या डावातील आक्रमणात २५ खेळाडू बाद करून केरळपुढे मोठे आव्हान ठेवले. यामध्ये अंकिता देवकरने ८ खेळाडू, तर धनश्री करेने ५ खेळाडू बाद करत चांगली कामगिरी केली. संरक्षणामध्ये अंकिता देवकरने २ मिनिटे, तर धनश्री कंकने ३:३० मि. व एक खेळाडू बाद केला आणि सानिका चाफेने २ मि. संरक्षण करत विजयांमध्ये मोलाची कामगिरी बजावली. पराभूत केरळतर्फे एस. हर्षदाने चांगली लढत दिली, तर उर्वरित खेळाडूंना जास्त काळ मैदानावर तग धरला आला नाही. त्यामुळे महाराष्ट्राला मोठा विजय साजरा करता आला.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …