राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे १ नोव्हेंबरला वितरण

नवी दिल्ली – क्रीडा मंत्रालय मागील वर्षाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांना १ नोव्हेंबरला येथे अशोका हॉटेलमधील एका कार्यक्रमात बक्षीस वितरण करेल. क्रीडा मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, २०२० च्या सर्व विजेत्यांना अगोदरच रोख पुरस्कार दिलेला आहे, पण आता एका कार्यक्रमात चषक व प्रशस्तीपत्रक प्रदान केले जाईल. मागील वर्षी कोविड-१९ महामारीमुळे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समारंभ ऑनलाईन आयोजित करण्यात आलेला. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रत्येक वर्षी हॉकीमधील जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती दिनी २९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिनी प्रदान केला जातो. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांत मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार यांचा समावेश आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …