राष्ट्रीय कुस्तीपटू निशा दहिया ठणठणीत

हत्या झाल्याची अफवा
चंदीगड – राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटू निशा दहिया ठणठणीत असून, तिची हत्या झालेली नाही. तिची गोळ्या झाडून हत्या झाल्याची अफवा पसरली होती. या अफवेनंतर निशा दहियाने एक व्हिडीओ शेअर करीत आपण ठणठणीत असल्याचे सांगितले आहे, तसेच आपण आगामी सामना पूर्ण क्षमतेने खेळणार असल्याचेदेखील निशाने या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. निशा दहिया हिची गोळ्या झाडून हत्या झाल्याची अफवा बुधवारी सायंकाळच्या सुमारास पसरली होती. अज्ञात हल्लेखोरांनी तिच्यावर अचानकपणे हल्ला करून तिच्यावर गोळ्या झाडल्या, तसेच या हल्ल्यात तिच्या भावाचादेखील मृत्यू आणि आई गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र ही नुसतीच अफवा असून, कुस्तीपटू निशा दहिया ही ठणठणीत असल्याचे समोर आले आहे. ती सध्या तिच्या आगामी सामन्याची तयारी करीत आहे. तिच्या हत्येचे वृत्त प्रसिद्ध होताच निशाने एक व्हिडीओ संदेश जारी केला आहे. यामध्ये तिने आपण ठणठणीत असल्याचे सांगितले आहे, तसेच माझ्या घरातील सदस्यदेखील सुरक्षित असून, त्यांना काहीही झालेले नसल्याचे तिने म्हटले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …