राष्ट्रीय किशोर-किशोरी खो-खो स्पर्धेचे राज्यपालांच्या हस्ते शानदार उद्घाटन

मुंबई – ३१ वी किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे आयोजन २७ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर २०२१ या कालावधीत इंदिरा स्टेडियम, नांगल रोड, उना, हिमाचल प्रदेश येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचे किशोर व किशोरी हे दोन्ही संघ सहभागी झालेले आहेत. या स्पर्धेसाठी तीन मॅट मैदाने तयार केली आहेत. या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन राज्यपाल विश्वनाथ अर्लेकर यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी मंत्री वीरेंद्र कंवर (कृषी, पंचायत राज व मत्स पालन मंत्री), एम. एस. त्यागी महासचिव (भारतीय खो-खो महासंघ) व विविध क्षेत्रातील मान्यवर व खो-खो पदाधिकारी उपस्थित होते. कोविड-१९ मुळे छोट्या खेळाडूंचे संघ तयार करणे जिकरीचे झाल्यामुळे या राष्ट्रीय स्पर्धेत अरुणाचल प्रदेश, अंदमान-निकोबार, आसाम, दादरा-नगर हवेली, मणिपूर, नागालँड, पुंदूचेरी, सिक्किम, मेघालय यांचे दोन्ही तर चंदिगड, गोवा व ओडिसा यांचे मुलींचे संघ स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे त्या-त्या संघांनी कळवले आहे. उद्घाटनानंतर झालेल्या सामन्यात महाराष्ट्राचे सामने शनिवारी होणार नसल्याचे आयोजकांकडून कळवण्यात आले, तर शनिवारी झालेल्या किशोरींच्या सामन्यात यजमान हिमाचल प्रदेशने बिहारचा २१-०४ असा एक डाव १७ गुणांनी धुव्वा उडवला. किशोरांच्या सामन्यात छत्तीसगडने गोव्याचा २६-०१ असा एक डाव २५ गुणांनी धुव्वा उडवला, तर किशोरांच्याच केरळने यजमान हिमाचल प्रदेशचा ९-६ असा एक डाव ३ गुणांनी पराभव केला.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …