* भातखळकर यांची पोलिसात तक्रार दाखल
मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रात मोदीविरोधी मोट बांधण्यासाठी त्यांनी मुंबईत महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे, त्याचा हा दौऱ्यावरुन भाजपा नेत्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. त्यातच, मुंबईतील वायबी सेंटरमध्येराष्ट्रगीत गाताना त्या खाली बसल्या होत्या. यावरून ‘प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ॲक्ट १९६१” च्या कलम ३ नुसार तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी तक्रार भाजपने केली आहे.भाजप नेतेआणि विधानपरिषद विरोधी पक्षनेतेप्रवीण दरेकर यांनी मागणी केली तसेच मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचेआमदार अतुल भातखळकर यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
मुंबई दौऱ्या दरम्यान मुंबईतील वायबी सेंटर येथे विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच पत्रकार यांच्याशी संवाद साधल्यानतंर राष्ट्रगीता कार्यक्रम पार पडला. त्यावेळी, त्यांना राष्ट्रगीताचा सन्मान राखण्याचा विसर पडल्याचा आरोप होत आहे. ममता यांचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये, बॅनर्जी यांनी राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात केली. पण, त्या राष्ट्रगीत अर्धवटच बोलल्या. इतकेच नाही तर ते माध्यमांसमोर राष्ट्रगीत खाली बसून गायल्या. त्यामुळे ममता दीदींकडून राष्ट्रगीतचा अवमान झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. तर, प्रवीण दरेकर यांनी ममता बॅनर्जींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मुख्यमंत्र्यांकडेमागणी केली आहे.
ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा अवमान केला आहे. एकतर त्या राष्ट्रगीत बसून म्हणाल्या, इतकंच नाही तर राष्ट्रगीत अर्धवट म्हणत उठल्या. या अवमानासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. शेवटी राष्ट्राभिमान महत्वाचा आहे, परंतु देशाभिमानापेक्षा त्यांना राजकारण मोठे वाटले, असे म्हणत दरेकर यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
बुधवारी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी बसूनच राष्ट्रगीताला सुरुवात केली. ‘जन गण मन अधिनायक जय है’, असं ते बसून म्हणाल्या. त्यानंतर ते बोलता बोलता जागेवरुन उठल्या. यावेळी त्या राष्ट्रगीच्या उर्वरित ओळी बोलू लागल्या. ”भारत भाग्यविधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंग”, इथपर्यंतच त्या राष्ट्रगीत म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी ‘जय महाराष्ट्र, जय बंगाल, जय भारत’, अशी घोषणा केली. त्यामुळे हा अत्यंत गंभीर प्रकार असून बेकायदेशीर रित्या भारतात राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांचा व रोहिंग्या मुस्लिमांचा कायमच कळवळा असणाऱ्या व देशविघातक किंवा हिंदूविरोधी शक्तींना पाठबळ देणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी अशा प्रकारे राष्ट्रगीताचा अवमान करून तमाम भारतीयांच्या भावनांना ठेच पोहचविण्याचेकाम केले आहे. ‘प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ॲक्ट १९६१” च्या कलम ३ नुसार तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी तक्रार आ. भातखळकर यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
तसेच, कायमच आपल्या कथित देशप्रेमाची महती सांगणारे शिवसेना नेते मात्र यावर मूग गिळून गप्प आहेत. अशा प्रकारे राष्ट्रगीताचा अवमान करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या समोर झुकण्याचे काम शिवसेनेने केले आहे हे महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. पुढील २४ तासांच्या आत ममता बॅनर्जी यांच्या विरोधात गुन्हा दाखल न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे सुद्धा आमदार भातखळकर म्हणाले.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …