राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ : क्विन्स बेटन रिले दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू व ओडिशात दाखल होणार

नवी दिल्ली – बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये क्विन्स बेटन रिले १२ ते १५ जानेवारीच्या काळात दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू व ओडिशामध्ये होईल, ज्याच्यासाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने एक समिती संघटीत करण्याचा निर्णय घेतला आहे. क्विन्स बेटन रिले ७२ देशांच्या आपल्या प्रवासादरम्यान चार दिवस भारतात राहिल. आयओए अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी एका प्रसिद्धीपत्रकात समिती संघटीत करण्याबाबत माहिती दिली. बत्रा म्हणाले, महासचिव राजीव मेहता व मला हे सांगताना आनंद होत आहे की, आयओएने बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ च्या क्विन्स बेटन रिले कार्यक्रमाची तयारी व संचालनासाठी त्रीसदस्यीय समिती संघटीत करण्याचा निर्णय घेतला. समितीमध्ये आयओए कार्यकारी परिषदेचे सदस्य राकेश गुप्ता, मुकेश कुमार व भारतीय नेटबॉल महासंघाचे कार्यकारी परिषद सदस्य हरिओम कौशिक असतील. आयओए संचालक जॉर्ज मॅथ्यू व आयओए संयुक्त संचालक नाजिमा खान त्यांची मदत करतील. रिले १२ जानेवारीला दिल्लीत, १३ जानेवारीला अहमदाबादमध्ये, १४ जानेवारीला बंगळुरू व १५ जानेवारीला ओडिशात असेल. राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष व सचिवांवर याच्या योग्य संचालनाची जबाबदारी राहिल. रिले ७ ऑक्टोबरला बकिंघम पॅलेसपासून सुरू झाली, जिथे महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांनी बेटनवर राष्ट्रकुल देशांसाठी आपला संदेश लिहिला. बेटन २६९ दिवसांत १४०००० किलोमीटरचा प्रवास गाठेल व जवळपास ७५०० जणांना बेटन हातात घेण्याची संधी मिळेल. ही बेटन ख्रिसमसच्या पूर्व संध्येला सेशेल्समध्ये, नववर्षी मालदीव व ईस्टरवर जमैकामध्ये असेल. बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धा २८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ काळात खेळवली जाईल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …