‘राम सेतु’ करिता अंडरवॉटर सिक्वेन्स शूट करणार अक्षय कुमार

बहुचर्चित ‘राम सेतु’च्या शूटिंगसाठी अवघा एक महिना राहिला असून, हे शूटिंग मुंबईत संपवण्याचा निर्णय मेकर्सनी घेतला आहे. प्रोडक्शन टीम सध्या संपूर्ण शेड्यूल सेट करत आहे आणि हे शूटिंग इन्डोअर आणि आऊटडोअर शूट होणार आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल अशी आशा आहे. या शूटिंगदरम्यान अभिनेता अक्षय कुमार हा अंडरवॉटर सिक्वेन्स शूट करणार असल्याची चर्चा आहे.
जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरुचासह कलाकारांनी नोव्हेंबरमध्ये उटीचे शेड्यूल पूर्ण केले. त्यानंतर पाण्याखालचे सीन्स आणि समुद्रच्या शॉटच्या शूटिंगसाठी टीमला श्रीलंकेला जायचे होते, परंतु सध्याच्या महामारीमुळे ते शक्य नव्हते. त्यामुळे काही रिसर्च आणि ऑन लोकेशन रेकी केल्यानंतर टीमने दमन आणि दीवमध्ये हे सीन्स शूट करत अंतिम

रूप दिले गेले, परंतु काही शॉट्स अद्याप बाकी असून मेकर्सनी ते मुंबईत संपवण्याचा निर्णय घेतला आहे. या शूट दरम्यान अक्षय कुमार काही हाय ऑक्टेन अंडरवॉटर सिक्वेन्स करताना दिसून येणार आहे. त्याकरिता एका इंटरनॅशनल क्रूदेखील तैनात करण्यात आले आहे.’ अभिषेक शर्माद्वारे दिग्दर्शित ‘राम सेतु’ची घोषणा दिवाळी २०२० मध्ये करण्यात आली होती, परंतु अक्षय कुमारसह अनेक क्रू सदस्यांना कोरोना व्हायरस लागण झाल्याने चित्रपटाच्या शूटिंगला विलंब झाला.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …