ठळक बातम्या

रामगोपाल वर्माच्या ‘लडकी’ चित्रपटाची कोट्यवधीला विक्री

अलीकडेच रामगोपाल वर्मा याच्या ‘डेंजरस’ या चित्रपटाच्या हक्कांच्या यशस्वी विक्रीनंतर आता त्यांचा आगामी चित्रपट ‘लडकी : एंटर द गर्ल ड्रॅगन’च्या हक्कांची देखील कोट्यवधींना विक्री झाली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच जबरदस्त चर्चेत आहे, कारण हा पहिला भारतीय मार्शल आर्ट चित्रपट आहे आणि हा चित्रपट इंडो-चायनीज संयुक्त प्रोडक्शनद्वारे बनला आहे. या चित्रपटाचे हक्क ४० लाख डॉलरना म्हणजे २९ कोटी रुपयांना विकले गेले आहेत. या चित्रपटाच्या निर्मिती खर्चापेक्षा ही रक्कम किती तरी जास्त आहे. त्यामुळे प्रदर्शनाआधीच चित्रपट यशस्वी झाला आहे. रामगोपाल वर्मा यांचा दुहेरी आनंद आहे.
लडकी या चित्रपटाचे जागतिक हक्त (चीनव्यतिरिक्त) विकले गेले आहेत. हे हक्क २९ कोटींना विकले गेले आहेत. रामगोपाल वर्मा यांच्या चित्रपटाच्या चायनीज व्हर्जनचे नाव द ड्रॅगन गर्ल असे आहे. १० डिसेंबर २०२१ ला चीनमधील वीस हजार चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. याशिवाय लडकी हा चित्रपट तमिळ आणि तेलगू भाषेतदेखील प्रदर्शत केला जाणार आहे. इतकेच नाही, तर या चित्रपटाचा एक मोठा इव्हेंट दुबईमध्येदेखील आयोजित केला जाणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत पूजा भालेकर, मल्होत्रा शिवम आणि प्रतीक परमार आहेत. या चित्रपटाचे प्रोमोज पाहून चित्रपट रसिकांमध्ये या चित्रपटाबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …