ठळक बातम्या

‘राधेश्याम’ साठी भाग्यश्री अवघ्या पाच दिवसांत शिकली भरतनाट्यम

डिजिटल प्लॅटफॉर्म आणि चित्रपटगृहांच्या मध्ये टीव्हीनेही आपले स्थान टिकवून ठेवले आहे. या माध्यमावर चित्रपट रिलीज होणे कलाकारांसाठी खूप महत्त्वाचे असते. कंगना राणावत आणि भाग्यश्री अभिनित ‘थलाइवी’चा वर्ल्ड प्रीमिअर नुकताच झी सिनेमावर झाला. ‘मैंने प्यार किया’ फेम अभिनेत्री भाग्यश्रीकरिता हा चित्रपट खूप खास आहे. या चित्रपटाद्वारे प्रदीर्घ काळानंतर ती प्रेक्षकांसमोर आली आहे. या निमित्ताने बोलताना भाग्यश्रीने आपल्या आगामी चित्रपटासाठी ‘राधेश्याम’साठी ती अवघ्या पाच दिवसांत भरतनाट्यम शिकली असल्याचे सांगितले.

यावर्षी आपला ‘थलाईवी’ चित्रपट प्रदर्शित झाला. त्याचबरोबर ‘राधेश्याम’चे शूटिंगही आपण आटोपले याबद्दल काय सांगू शकाल? या प्रश्नाला उत्तर देताना भाग्यश्री म्हणाली, मी हे वर्ष खुल्या दिलाने आपलेसे केले आहे. नव्या वर्षाचे स्वागतही असेच करेन. जितके प्रेम मी यापूर्वी गोळा करू शकले नाही, तितके प्रेम मला आता गोळा करायचे आहे. माझ्या मनात कोणतीच खंत नाहीयं. मी खूप नशीबवान आहे की, इतक्या वर्षांनंतरही मला इतकी इज्जत दिली जातेय. मी अभिनयापासून अनेक वर्षे दूर होते. आता जेव्हा नव्या पद्धतीने सुरुवात केली आहे, तर हाच प्रयत्न आहे की मी ते सर्व करेन जे मी यापूर्वी कधी केले नाही. ‘थलाईवी’मध्ये माझी भूमिका जरी छोेटी होती तरी लोकांचे प्रेम मात्र खूप मिळालेयं.
दरम्यान, आगामी प्रोजेक्ट ‘राधेश्याम’साठी पाच दिवसांमध्ये नृत्याचे धडे कसे काय गिरवले असा सवाल तिला करण्यात आला असता भाग्यश्री म्हणाली, जी मी इतके वर्ष ऊर्जा सांभाळून ठेवली होती ती बाहेर निघत आहे. मी क्लासिकल डान्स तितकाच शिकले जितके माझ्या परफॉर्मन्सकरिता गरजेचे होते. माझे गुरू हरीकिरण जी यांनी खूप मेहनत घेतली. सलग पाच दिवस आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत सराव केला होता, परंतु त्या पाच दिवसांनंतर तब्बल एक महिना मी चालू शकले नव्हते. नृत्य शिकण्यास खूप मेहनत लागते. आता मी जेव्हा क्लासिकल डान्स पाहते तेव्हा मला समजते की हा नृत्यप्रकार किती अवघड आहे. माझा डान्स सिक्वेन्स जॉर्जियामध्ये मायनस डिग्रीमध्ये शूट झाला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …