मुंबई – भारताचे माजी यष्टीरक्षक अजय रात्रा यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केला आहे. फरीदाबादमध्ये जन्मलेले ३९ वर्षीय रात्रा यांनी सहा कसोटी व १२ वनडेशिवाय प्रथम श्रेणीच्या ९९ सामन्यांत सहभाग नोंदवला आहे. मंगळवारी वृत्तसंस्थेशी संवाद साधताना ते म्हणाले की, जर संधी मिळाली तर भारतीय संघाच्या यशासाठी योगदान देणे खूप चांगले असेल. स्थानिक क्रिकेटमध्ये हरियाणाचे प्रतिनिधीत्व केलेल्या या माजी खेळाडूकडे कोचिंगचा चांगला अनुभव आहे. आता ते आसामचे मुख्य प्रशिक्षक आहेत व सैयद मुश्ताक अली चषकाआधी संघाच्या शिबिरात इशान्येच्या या राज्यात आहेत. ही टी-२० स्पर्धा ४ नोव्हेंबरला सुरू होईल. आयपीएलमध्ये त्यांनी दिल्ली कॅपिटल्ससोबत काम केले आहे व भूतकाळात ते भारतीय महिला संघासोबत ही कार्यरत होते. रात्रा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे नियमित सदस्य आहेत व त्यांनी रिद्धिमान साहा व ऋषभ पंतसारख्या भारताच्या यष्टीरक्षकांसोबत काम केले आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …