मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सतत काही ना काही कारणाने चर्चेत असतात. गेल्याच आठवड्यात त्यांनी एका बाळाचे नाव ठेवले, त्यामुळे ते चर्चेत आले होते. आताही त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ते चक्क आपल्या एका पदाधिकाऱ्याच्या खांद्याला मलम चोळून देताना दिसत आहेत. राज ठाकरे यांच्या नव्या घरी शिवतीर्थवर कार्यकर्त्यांच्या भेटीदरम्यान हा किस्सा घडला.
मनसेचे पदाधिकारी मनोज चव्हाण हे राज ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या मुंबईतल्या नव्या घरी म्हणजे शिवतीर्थ येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंना आपला हात दुखत असल्याचे सांगितले. यानंतर राज यांनी स्वत: मनोज चव्हाण यांच्या हाताला मलम लावून दिले. या वेळचा व्हिडीओ ठाणे-पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंना दैवत संबोधले आहे. आपल्या पोस्टमध्ये अविनाश जाधव म्हणतात, साहेब आज हात खूप दुखत आहे, थांब जरा आणि राजसाहेबांनी स्वत: मनोज चव्हाण यांच्या खांद्याला मलम लावलं. मी दैवत का म्हणतो त्याची प्रचिती पुन्हा एकदा!
या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भरपूर प्रतिक्रिया दिसत आहेत. अवघ्या काही मिनिटांमध्येच हा व्हिडीओ प्रचंड शेअर केला गेला. हा व्हिडीओ पाहून अनेक जणांनी राज ठाकरे यांचं आपल्या कार्यकर्त्यांशी असलेल्या नात्याबद्दल कौतुक केले आहे.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …