राज ठाकरे माझ्या हृदयात आहेत व राहतील – रुपाली पाटील

पुणे – राज ठाकरे माझ्या हृदयात राहतील. ते माझे दैवत आहेत व सदैव राहतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाचा मी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर माझी भूमिका मी जाहीर करणार आहे, असे वक्तव्य रुपाली ठोंबरे-पाटील यांनी व्यक्त केले, तसेच त्या पुढे म्हणाल्या की, मंगळवारी मी मुंबई येथे माझ्या वैयक्तिक कामासाठी गेले होते. वैजापूर येथील ऑनर किलिंगच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी मी गेले होते. तेथे माझी उपमुख्यमंत्री अजित पवार, युवासेनेचे नेते वरुण देसाई यांच्यासोबत भेट झाली. ती भेट ही सदिच्छा भेट होती, असेही रुपाली पाटील म्हणाल्या.

आपल्या राजीनाम्याबाबत बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, मी संघर्ष करणारी व सर्वसामान्यांवर प्रेम करणारी कार्यकर्ती आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मी राज ठाकरे यांना पाहूनच आले. मला कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नसताना मी राजकारणात आले. मी माझ्या स्वार्थासाठी राज ठाकरे व मनसेच्या कार्यकर्त्यांना कधीही वाईट बोलणार नाही, परंतु माझे मत, माझ्या मनातील खदखद हे माझे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या चौकटीत राहून सन्मानीय राज ठाकरे यांच्यापर्यंत माझे मत पोहचवले आहे. मनसेत निस्वार्थी प्रेम करणारे प्रचंड कार्यकर्ते आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मला भरभरून प्रेम दिले. मी त्यांची कायम ऋणात राहीन. आगामी निर्णयाबाबत भाष्य करताना रुपाली पाटील म्हणतात की, मी कुठे तरी जायचे म्हणून मनसेला बदनाम करेन, राज ठाकरेंना बदनाम करेन, असे करणार नाही. बदल घडत नसतील, तर स्वत:मध्ये बदल करायला हवेत. मनसेत काय बदल करायचे हे सांगण्यासाठी मी राज ठाकरे यांच्या एवढी मोठी नाही. नवीन कोणत्या पक्षात प्रवेश करणार हा निर्णय अद्याप घेतलेला नाही. हो मला ऑफर आलेल्या आहेत. तो निर्णय जाहीर झाला की व्यक्त होईल.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …