मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. राज्य सेवा परीक्षा २०२१ अंतर्गत ३९० पदांसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, एमपीएससीने उमदेवारांचा प्रतिसाद पाहता अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ दिली होती. ऑनलाइन अर्ज सादर करणे आणि ऑनलाइन पद्धतीने शुल्क जमा करण्यास २ नोव्हेंबर, तर बँकेत शुल्क जमा करण्यासाठी ३ नोव्हेंबरची मुदत देण्यात आली होती. काही उमेदवारांनी ऑनलाइन पेमेंट जमा करून देखील त्यांच्या ऑनलाइन पोर्टलवर शुल्क जमा नसल्याचे दाखवले जात असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. आयोगाने उमेदवारांच्या तक्रारीची दखल घेत १८ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने शुल्क जमा करण्याची संधी दिली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या समस्येची दखल घेत परीक्षा शुल्क जमा करण्याची आणखी एक संधी दिली आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्या उमेदवारांचे अर्ज परीक्षा शुल्काअभावी अपूर्ण राहिले आहेत, त्यांनी आनलाईन पद्धतीने १८ नोव्हेंबर रात्री २३.५९ पर्यंत शुल्क सादर करावे, असे आवाहन आयोगाने केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमदेवारांना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क जमा करण्यासाठी ‘एसबीआय ई पे’ आणि ‘क्विक वॉलेट’ अशा दोन पेमेंट गेटवेची सुविधा दिली आहे. परीक्षा शुल्क यशस्वीरित्या जमा झाल्याची खात्री झाल्याशिवाय पोर्टलवरून बाहेर पडू नये, अशा सूचना आयोगाने केल्या आहेत.
2 comments
Pingback: buy magic mushrooms online australia
Pingback: ขอแนะนำ ค่ายคาสิโน Pretty GAMING