ठळक बातम्या

राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा : सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, पुणे व ठाणे उपउपांत्य फेरीत


मुंबई – महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व सोलापूर अम्याचूर खो खो असोसिएशन यांच्या मान्यतेने ५७ वी पुरुष महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी खो-खो स्पर्धा माननीय श्रीमंत संजीवराजेनाईक निंबाळकर अध्यक्ष महाराष्ट्रखो-खो असोसिएशन यांच्या प्रमुख उपस्थिती खाली सुरू झाली. यातून स्पर्धेतून जबलपूर, मध्य प्रदेश येथे होणाऱ्या ५४ व्या राष्ट्रीय पुरुष-महिला खो खो स्पर्धेत सहभागी होणारा संघ निवडला जाणार आहे. आपापले सामने जिंकत सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, पुणे व ठाणेसंघाने उपउपांत्य फेरीत धडक मारली.
आज झालेल्या पुरुष गटात अहमदनगरनेसिंधुदुर्गवर १८-६ अशी एक डावानेमात केली. यात अकाश ढोलेन्याने ४ गुण मिळवित ३.२० मिनिटे संरक्षण करीत अष्टपैलू खेळ केला. आवेज पठाणने२.५० मिनिटेपळती केली. अहमदनगरनेसिंधुदुर्गच्या खेळाडूंना चमक दाखवण्याची जराही संधि दिली नाही. अन्य दुसऱ्या सामन्यात गतविजेत्या मुंबई उपनगरने बीडवर २३-१२ अशी एक डावानेनमविले. अक्षय भांगरे याने५ गडी बाद करीत १.१० मिनिटे नाबाद खेळी केली. अनिकेत पोटे(२.५० व २.१० मिनिटे व २ गुण) याने अष्टपैलू खेळ केला. बीडकडून तुकाराम कराडे (३ गुण) याने एकाकी लढत दिली. पुरुष गटात पुणेसंघानेनंदुरबार संघावर १९-१० आणि एक डावाने, सांगलीनेजळगावचा २७-९ एक डावाने, ठाण्यानेरत्नागिरीवर २५-११ एक डावानेविजय मिळवत उपउपांत्य फेरीत धडक मारली.
महिला गटात सोलापूरने धुळ्यावर २२-३ असा एक डावानेदणदणीत विजय मिळविला. शिवानी येंड्रावकरनेआपल्या धारधार आक्रमणात ८ बळी मिळवताना २.०० मिनिटे नाबाद खेळी करीत अष्टपैलू कामगिरी केली. प्रीती काळे हीने ४.५० व अर्चना व्हनमाने हीने ४.१० मिनिटे नाबाद संरक्षणाची बाजू सांभाळली. संध्या सुरवसे हीने ६ खेळाडू गारद केले.
महिलांच्या दुसऱ्या सामन्यात उस्मानाबादनेपालघरवर १५-६ असा डावानेशानदार विजय मिळविला. यात अश्विनी शिंदे(३.५० मिनिटे व ४ बळी), संपदा मोरे (३.०० मिनिटे व ५ बळी), किरण शिंदे(२.३० मिनिटेनाबाद व २ बळी) यांनी अष्टपैलू खेळ केला. पालघरकडून कृपेक्षा महेरने (१.१० मिनिटे व १ बळी) हीने एकाकी लढत दिली. महिला गडातील रत्नागिरीनेरायगडचा २९-८ एक डावानेपराभव केला, तर पुणेमहिला संघानेनाशिक १३-११ पाच मिनिटेराखून धुव्वा उडवला तसेच ठाणेमहिलांनीही जालनाचा २१-८ एक डावानेविजय मिळवला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …