ठळक बातम्या

राज्यात मोकळ्या जागेत सांस्कृ तिक कार्यक्रमास परवानगी


मुंबई – राज्य सरकारने मोकळ्या जागेत सांस्कृ तिक कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. त्यामुळे आता लोककलाकारांना आपल्या लोककला सादर करता येणार आहेत. सांस्कृ तिक कार्यक्रमांना परवानगी मिळाल्याने आता दीड वर्षानंतर शाहिरीपासून ते तमाशांच्या फडापर्यंतचे कार्यक्रम रंगणार आहेत.
राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली आहे. शिवाय कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज होता; मात्र तिसरी लाट आलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारने अनेक गोष्टींना शिथिलता दिली होती. मात्र, लोककलावंतांना कोणताही दिलासा दिला नव्हता. त्यामुळे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे लोककलावंतांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारने बुधवारी एक पत्रक काढले आहे. त्यानुसार राज्यात सांस्कृ तिक कार्यक्रम आणि लोककलांना मोकळ्या जागेत कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनामुळे तमाशा, शाहिरी, भारुड या लोककलांना कार्यक्रम सादर करण्यास परवानगी नव्हती. आपल्यालाही सांस्कृ तिक कार्यक्रम करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी तमाशा लोककलावंत परिषदेने शासनाकडे केली होती. त्या अनुषंगाने बंदीस्त सभागृहे आणि मोकळ्या मैदानांत सर्व सांस्कृ तिक कार्यक्रम व लोककला सादर करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्याबाबतचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. यात तमाशा, दशावतार, भारुड, शाहिरी इत्यादी कार्यक्रमांसह टुरिंग टॉकिजला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तसेच या सर्वांना कोरोनाच्या अटींचे पालन करण्याचे बंधनही घालण्यात आले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन लागल्याने या लोककला कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. कार्यक्रम बंद झाले आणि उत्पन्नाचे काहीच साधन नाही अशी अवस्था या कलावंतांवर ओढवली होती. त्यामुळे या कलावंतांनी शासनाकडून मदत मिळावी, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली होती. या कलावंतांनी खासदार सुप्रिया सुळे आणि सांस्कृ तिक कामकाज मंत्री अमित देशमुख यांचीही भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडली होती. शरद पवार यांनी तर सरकारला पत्र लिहून या कलावंतांना मदत करण्याचे आवाहन केले होते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …