राज्यात पहिली तेचौथीच्या शाळा लवकरच सुरू करणार – आरोग्यमंत्री टोपेंची माहिती


मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालल्यानंतर हळूहळू सर्व गोष्टींमध्ये शिथिलता येत आहे. शहरी भागात ८ ते१२ वी आणि ग्रामीण भागात पाचवी ते१२ वीचेवर्गतसेच महाविद्यालयेसुरू झालेआहेत. आता राज्यात प्राथमिक शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. राज्यात पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याबाबत चाईल्ड कोविड टास्क फोर्सकडून मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. त्यानंतर आता पहिली तेचौथी शाळा सुरु होणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, शालेय शिक्षणंत्री वर्षागायकवाड यांच्यासोबतही शाळा सुरू करण्याच्या संदर्भात चर्चा झाली आहे. शालेय शिक्षण विभागाचाही शाळा सुरू करण्याच्या संदर्भात प्रस्ताव आहे. आरोग्य विभागानेतर परवानगी दिली आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होईल, निश्चितपणेमुख्यमंत्री स्तरावर या संदर्भात अंतिम निर्णय होईल. पहिली ते चौथी सर्व विद्यार्थी शाळेत आले पाहिजेत. त्यांचे लसीकरण केले पाहिजे. तसेच १२ ते१८ वयोगटातील मुलांचेलसीकरण करावे हा सुद्दा मुद्दा मांडण्यात आला आहे. ५० टक्के पर्यंतच्या परवानग्या नाट्यगृह आणि सिनेमागृहांना दिल्या आहेत. परिस्थिती सुधारत आहे आणि अशीच सुधारत राहिली तर भविष्यात निर्बंध आणखी शिथिल करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल. चाइल्ड टास्क फोर्सनेजरी हिरवा कंदील दिला तरी कॅबिनेट बैठकीत सोबतच मुख्यमंत्र्यांसोबत शाळा सुरु करण्याचा निर्णय बाबत चर्चा केली जाणार आणि त्यानंतर राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
आता राज्यात ७०० ते८०० रुग्ण दैनंदिन आढळून येत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रामाण ९८ टक्के इतके आहे. मुले आजारी पडल्याचं प्रमाण जास्त नाही. पालकांनी चिंता करण्याचेकारण नाही. तिसऱ्या लाटेची शक्यता असली तरी ती सैनव्य स्वरुपाची असेल, सध्यातरी फार काळजीचा विषय नाही, मात्र असेअसले तरी, काळजी घेणं आणि लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहेअसे ते म्हणाले. लसीकरणाच्या बाबतीत पहिला डोस पूर्ण झाल्याचे प्रमाण ८० टक्के इतकेआहे, तर दुसरा डोस पूर्ण झाल्याचं प्रमाण ४० टक्के इतके आहे. आता लसी देऊन एक वर्ष झाले आहे तर त्यांना बूस्टर डॉस देण्यात यावा अशी मागणी केंद्राकडे केली आहेअसंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं

आहे.

  • चाईल्ड कोविड टास्क फोर्सकडून हिरवा कंदील
    राज्यात पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याबाबत चाईल्ड कोविड टास्क फोर्सकडून मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. राज्य शासनाने शाळा सुरु करण्याबाबत इतर बाबींची पूर्तता केल्यास शाळा सुरु करण्यास काहीच हरकत नसल्याचं चाईल्ड टास्क फोर्सचे म्हणणेआहे.
    प्राथमिक शाळा, दिव्यांग शाळा आणि बोर्डिंग शाळा सुरू करता येतील असं टास्क फोर्सने राज्य सरकारला सल्ला दिला आहे. लहान मुलांसाठी लस जेव्हा उपलब्ध करून दिली जाईल, तेव्हा लहान मुलांचेलसीकरण सुरु होईल, मात्र त्यापूर्वीशाळा सुरु करण्यास हरकत नसल्याचेही टास्क फोर्समधील डॉक्टरांचेम्हणणे आहे. आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. पीडियाट्रिक टास्क फोर्स ने सुचवल्या काही उपाय योजना सुचवल्या आहेत. बोर्डिंग स्कुल म्हणजेच निवासी शाळा मध्ये येताना मात्र आरटीपीसीआर चाचणी रिपोर्ट बंधनकारक करावा असा सल्ला देण्यात आला आहे.
    दरम्यान, मुंबईमध्ये पहिली ते आठवीचे वर्ग सुरु करण्याकरता मुंबई महापालिकेनं तयारी दर्शवली आहे. तसं राज्य सरकारलाही कळवण्यात आलं आहे. शाळा सुरु झाल्यानंतर कोविड रुग्णसंख्या वाढलीच तरी महापालिका प्रशासन पूर्ण सक्षम आहे असे महापालिकेनं राज्य सरकारला कळवले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …