राज्याकडून ११ देशांसाठी नवीन नियमावली

मुंबई – ओमिक्रॉन रुग्णांची वाढती संख्या पाहता आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जारी केली आहे. राज्य सरकारकडून दक्षिण आफ्रिकेसह ११ देशांना हाय रिस्कमध्ये ठेवण्यात आले असून, या देशांतून येणाºया प्रवाशांना कठोर नियमांचे पालन करावे लागणार आहे. या हाय रिस्क देशांच्या यादीमध्ये लंडन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बोत्सवाना, मॉरिशियस, न्यूझीलंड, सिंगापूर, हाँगकाँग, झिम्बाब्वे, इस्त्राएल, चीनचा समावेश आहे.
सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर या चाचणीमध्ये ओमिक्रॉनची बाधा झाल्याचा रिपोर्ट आला, तर सक्तीचे क्वारंटाइन करून नियमांनुसार उपचार घ्यावे लागतील. निगेटिव्ह येईपर्यंत सर्व नियमांनुसार उपचार घ्यावे लागतील.

About Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …