जालना – राज्यांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात अद्याप लॉकडाऊन लागणार नाही. केंद्र सरकारच्या नव्या गाइडलाइननुसार देशातील इतर राज्यांतून महाराष्ट्रात विमानाने येणाऱ्या प्रवाशांना दोन डोस घेतलेले असताना, आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असणार नाही. बाहेर देशातून आलेल्या नागरिकांना म्हणजेच तो इतर राज्यात गेलेला असेल आणि त्यानंतर तो राज्यात आला, तर त्याला आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असणार असून, ७ दिवस क्वारंटाइन राहणे बंधनकारक राहील, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. ते जालन्यात बोलत होते. सध्या राज्यात लॉकडाऊन लावण्यासारखे कोणतेही कारण नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …