२ जानेवारी, २०२२ रोजी आयोजन
मुंबई – महाराष्ट्र लोक सेवा आयोगा (एमपीएससी)ने राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ चे आयोजन २ जानेवारी, २०२२ रोजी करण्याचे निश्चित केले आहे. राज्यसेवा परीक्षा २०२१ अंतर्गत ३९० पदांसाठी परीक्षा घेण्याचे महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने निश्चित केले आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जाहीर केली आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी २,५१,५८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती आयोगाने जाहीर केली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क जमा करण्याची प्रक्रिया अपूर्ण राहिली होती, त्यांना पुन्हा एक संधी दिली होती. विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क जमा केल्यानंतर आयोगाने परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या जाहीर केली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ च्या जाहिरातीनुसार पूर्व परीक्षा २ जानेवारी, २०२२ रोजी व मुख्य परीक्षा दिनांक ७, ८ व ९ मे, २०२२ रोजी आयोजित करण्यात येईल.
उपजिल्हाधिकार १२, पोलीस उपअधीक्षक १६, सहकार राज्य कर आयुक्त १६ , गटविकास अधिकारी १५, सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ १५, उद्योग उप संचालक ४, सहाय्यक कामगार आयुक्त २२, उपशिक्षणाधिकारी २५, कक्ष अधिकारी ३९, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ४, सहाय्यक गटविकास अधिकारी १७, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था १८, उपअधीक्षक भूमी अभिलेख १५ , उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क १, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क १, सहकारी कामगार अधिकारी ५४, मुख्याधिकारी गट ब ७५, मुख्याधिकारी गट अ १५, उपनिबंधक सहकारी संस्था गट अ १० पदांसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने सुरुवातीला २९० जागांसाठी अर्ज मागवले होते; मात्र त्यानंतर पुन्हा पदसंख्येमध्ये १०० पदांची वाढ करण्यात आली होती.
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …