१२५ वऱ्हाड्यांसाठी ताज, ओबेरॉयमध्ये बुकिंग
मुंबई – बॉलीवूड स्टार कतरिना कैफ आणि विक्की कौशल लग्नबंधनात अडकणार असल्याच्या वृत्तांना अखेर दुजोरा मिळाला आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कतरिना आणि विक्की लग्नगाठ बांधणार असून, हा रॉयल लग्नसोहळा राजस्थानमधील हॉटेल सिक्स सेन्स बरवाडा फोर्टमध्ये पार पडणार आहे, तसेच वऱ्हाडी मंडळींसाठी सवाई माधोपूर रणथंबोर रोड स्थित फाइव्ह स्टार ताज आणि ऑबेरॉय हॉटेलमध्ये बुकिंग करण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, विविध हॉटेल्समध्ये एकूण १२५ व्हीआयपी पाहुण्यांसाठीचे बुकिंग करण्यात आले आहे. याशिवाय पाहुणे आणि सेलिब्रिटींना विमानतळाहून हॉटेलपर्यंत आणण्यासाठी एका ट्रॅव्हल कंपनीसोबत करार करण्यात आला असून, त्यासाठी ४० महागड्या कार बुक करण्यात आल्या आहेत. यात ऑडी, रेंज रोव्हरसह वॅनिटी व्हॅन्सचाही समावेश आहे, तर लग्नाच्या सीझनमुळे याआधीच बरेचशा डेकोरेटर्सचे बुकिंग झालेले आहे. त्यामुळे इव्हेंट कंपन्यांना डेकोरेशनच्या सामानासाठी खूप शोधाशोध करावी लागत आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …