ठळक बातम्या

राजस्थानमध्ये ट्रक व बसचा भीषण अपघात; १२ जणांचा मृत्यू

जयपूर – प्रवासी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि त्यानंतर गाड्यांनी तात्काळ पेट घेतला. या दुर्घटनेत १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील पचपदरा येथे हा अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. अपघातातील जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेची माहिती मिळताच राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला असून, अपघातातील जखमींना योग्य ते उपचार देण्याचे निर्देश दिलेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी प्रवासी बसमध्ये एकूण २५ प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली आणि त्यानंतर दोन्ही गाड्यांनी पेट घेतला. पचपदरा येथील आमदार मदन प्रजापत याबाबत म्हणाले की, बसमधील प्रवासी हे तामिळनाडू, राजस्थान आणि इतर ठिकाणचे होते. या अपघातानंतर २१ जणांना बसमधून बाहेर काढले आहे. बसमध्ये नेमके किती प्रवासी होते याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …