रहाणेची काळजी वाढली!

कानपूर – भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूरच्या मैदानावर पहिला कसोटी सामना सुरू आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने चांगली धावसंख्या उभारली आहे. भारतीय संघाकडून ३४५ धावांचा डोंगर उभारण्यात आला असून, यामध्ये पदार्पण करणाऱ्या श्रेयसचे शतक एक सर्वात विशेष आणि मोठी गोष्ट आहे, पण याच शतकामुळे संघातील एका खेळाडूचे टेन्शन मात्र वाढले आहे. हा खेळाडू म्हणजे कर्णधार अजिंक्य रहाणे. यामागील कारण म्हणजे मागील काही सामन्यांत खास कामगिरी करू न शकलेल्या रहाणेसाठी ही कसोटी म्हणजे जवळपास ‘करो या मरो’ अशीच होती. ज्यात तो केवळ ३५ धावा करू शकला, तर दुसरीकडे संघात त्याच्या स्थानावर अगदी परफेक्ट बसणाऱ्या श्रेयसने पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकावले आहे. त्यामुळे आता पुढील सामन्यामध्ये नेमकी प्लेयिंग ११ कशी असणार? हा मोठा प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर उभा राहिला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू असून पहिली कसोटी सध्या सुरू आहे. त्यामध्ये विराटला विश्रांती दिल्यामुळे अजिंक्य रहाणे कर्णधारपद सांभाळत आहे, पण दुसऱ्या सामन्यात विराट पुन्हा कर्णधारपदावर येणार असल्याने संघ पूर्णपणे बदलणार आहे. विराटला संघात स्थान मिळताच कोणत्या फलंदाजाला विश्रांती द्यायची हा प्रश्न संघासमोर असणार आहे. विराटच्या स्थानावर पुजारा, रहाणे आणि आता नव्याने संघात आलेल्या श्रेयस यांचा समावेश आहे. अय्यरने शतक झळकावत आपले स्थान पक्के केले आहे, तर पुजाराने २६ आणि रहाणेने ३५ धावा केल्यामुळे त्यांचे स्थान डळमळीत झाले आहे. रहाणे संघाचा उपकर्णधार असल्याने त्याची जबाबदारी मोठी आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत त्याचेच स्थान अधिक धोक्यात आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …