रश्मी देसाईने शहरी बाबूवर दाखवल्या किलर डान्स मूव्हज

रश्मी देसाई ही एक नुसती चांगली अभिनेत्रीच नाही, तर त्याचबरोबर एक उत्कृष्ट डान्सरही आहे. याची झलकही तिने अनेकदा दाखवून दिली आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच आपल्या डान्सचे व्हिडीओज आणि फोटोज शेअर करत असते आणि हे व्हिडीओज आणि फोटोज मिनीटांमध्ये व्हायरलही होतात. आता रश्मीने आणखी एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रश्मी देसाई कोई शहरी बाबू गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे. चाहत्यांपासून सेलीब्रेटींपर्यंत सर्वच रश्मीच्या डान्स मूव्हजचे कौतुक करत आहेत. देवोलीना भट्टार्चाजी, राखी सावंत, मोनालिसा आणि दलजीत कौरसह अनेक अभिनेत्रींनी रश्मीच्या शहरी बाबू डान्सचे कौतुक केले आहे. प्रोफेशनल फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रश्मी सध्या वेबसीरिजमध्ये बिझी आहे. गेल्या वर्षी ती तंदूरमध्ये दिसून आली होती, तर सध्या ती डान्स ट्रस्ट आणि लव्ह/फेथमध्ये पाहायला मिळत आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …